File Photo 
नांदेड

Nanded Breaking : मिल्लतनगरातील एका व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील संशयीत १९२ व्यक्तिंचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १२८ अहवाल शनिवारी (ता.३० मे) सकाळी प्राप्त झाले असून, त्यात मिल्लतनगरमधील एक व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.  

लोहारगल्ली, इतवारा, कुंभारटेकडी आदी परिसरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील १९२ संशयीतांचा स्वॅब शुक्रवारी (ता.२९ मे) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी १२८ अहवाल प्राप्त झाले असून, त्यात मिल्लतनगर येथील ३२ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह सापडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता १४४ इतकी झाली आहे.  

शनिवारी नव्याने प्राप्त झालेल्या अहवालातील १३ स्वॅब नाकारण्यात आले आहेत. तर पाच अहवाल अनिर्णित ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाठविलेल्या स्वॅब अहवालापैकी ८१ स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. शुक्रवारी (ता.२९) एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथील आठ रुग्ण व उपजिल्हा ग्रामिण रुग्णालय मुखेड येथील एक रुग्ण असे एकूण नऊ पॉझिटिव्ह रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत १४४ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ९० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित ४४ रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील दोन स्त्री रुग्ण वय (५२ व ५५) यांची प्रकृती गंभीर आहे.

आत्तापर्यंत ९० रुग्ण घरी
शुक्रवारी (ता.२९ मे) सांयकाळपर्यंत एक लाख ३८ हजार ४६६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. तर तीन हजार ७५१ रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी तीन हजार २३८ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकुण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १४४ झाली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९० पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आता ८१ अहवालाची प्रतिक्षा

जिल्ह्यात ४२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १९२ स्वॅबची तपासणी अहवालातील सकाळी १२८ रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. यातील ८१ स्वॅब अहवाल येणे बाकी आहे.
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT