file photo 
नांदेड

Gram Panchayat Result : अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, कोंढा, येळेगाव, कामठा, दाभडच्या ग्रामपंचायतीचे निकाल धक्कादायक 

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा परभणी) : तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीचे निकाल धक्कादायक लागले आहेत. काॅग्रेसच्या पदाधिका-यांनी आपले गड राखले आहेत. येळेगावमध्ये माजी सभापती आनंद कपाटे, कोंढ्यात पप्पु पाटील कोंढेकर, खैरगावात बालाजी गव्हाने तर मालेगावात स्थानिक आघाडीला बहुमत मिळाले आहे. तर कामठ्यात माजी सभापती मंगला स्वामी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातील अर्धापूर तालुक्यात काही ग्रामपंचायतीचा अपवाद वगळता स्थानिक काॅग्रेसच्या पदाधिका-यांनी आपले गड राखले आहेत. पण लहान ग्रामपंचायतीचा निकाल मात्र काॅग्रेसच्या पदाधिका-यांना विचार करण्यासारखा आहे. येळेगावात माजी सभापती आनंद कपाटे विजयी झाले तर कामठ्यात माजी सभापती मंगला स्वामी पराभूत झाल्या आहेत.

कामठ्यात यंदा सत्ता परिवर्तन झाले असून रणजितसिंग कामठेकर यांची दहा वर्षानंतर सत्ता आली आहे. त्यांच्या गटाला नऊ जागा तर शिवलिंग स्वामी यांच्या गटाला चार जगा मिळाल्या आहेत.

कोंढ्यातील तिरंगी लढतीत यूवक काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर यांच्या गटाला आठ जागा मिळाल्या आहेत. काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाने यांच्या गटाच्या चार जगा मिळाल्या आहेत. तालुक्याचे लक्ष लागलेल्या मालेगाव गावात स्थानिक आघाडीला बहुमत मिळाले आहे. या आघाडीला नऊ , डाॅ लक्ष्मण इंगोले चार तर नागोराव इंगोले दोन जागा मिळाल्या आहेत.

पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच वसंतराव कल्याणकर यांच्या गटाला  सहा, बालाजी कल्याणकर यांच्या गटाला पाच जागा मिळाल्या आहेत. सावरगाव उध्दव आबादार यांच्या गटाला नऊ जागा मिळाल्या आहेत. दाभड ग्रामपंचायतीमध्ये सासूबाई रेखाबाई दादजवार विजयी झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीला बहुमत मिळाले आहे. आंबेगात अमोल डोंगरे, भोगावमध्ये काशीराव हक्के, मेंढला खुर्दमध्ये दत्ता नवले यांना बहुमत मिळाले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation tiger : ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेशाचा १९ जूनचा मुहूर्त ‘तांत्रिक’, ‘भावनिक’ बाबींमुळे टळणार? एकनाथ शिंदेंची सावध खेळी

मोठी बातमी! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीचे प्रवेश पुढच्या वर्षीच; ‘AICTE’ची मान्यता नाही; आता वर्षभरात पदभरती, इमारतीची डागडुजी, संचालक म्हणाले...

आजचे राशिभविष्य - 18 जून 2026

18 जून 2026 पंचांग! गुरुपुष्यामृत योगासह वैनायकी गणेश चतुर्थीचा शुभ दिवस

Oats-Paneer Dosa: प्रोटीन आणि फायबरचा पॉवरहाऊस! वजन कमी करायचं असेल तर डाएटमध्ये नक्की अॅड करा ओट्स-पनीर डोसा

SCROLL FOR NEXT