File photo 
नांदेड

नांदेड : महागाईला तेलाची फोडणी, गव्हाच्या दरातही वाढ

प्रमोद चौधरी

नांदेड : एकीकडे इंधनदर कडाडले असतानाच कोरोनामुळे बाहेरच्या देशांतून सूर्यफुल तसेच पाम तेलाची आयातही घटल्याने सोयाबीन तेलाला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने दिवाळीपासून खाद्यतेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. दिवाळीनंतर खाद्यतेल किलोमागे आठ ते दहा रुपयांनी महागल्याने सर्वसामान्यांचा महिन्याचा आर्थिक ताळेबंद बिघडला आहे.

दिवाळीदरम्यान सोयाबीन तेल १०२ ते १०३ रुपये लिटर होते. त्यात पाच ते सात रुपयांची वाढ झाली असून, ते १०७ ते ११० रुपयांपर्यंत गेले आहे. सूर्यफूल तेलातही किलोमागे दहा रुपयांची वाढ होऊन ते १२० ते १३० रुपयांपर्यंत गेले आहे. सूर्यफूल, तसेच सोयाबीन तेलाच्या पंधरा किलोच्या डब्यामागे शंभर ते सव्वाशे रुपयांनी वाढ झाली आहे. तेल ही प्रत्येक घरातील अत्यावश्यक गरज असल्यामुळे त्यासाठी महिन्याच्या बजेटमधील जास्त पैसे मोजावे लागत असल्याने किचनचा ताळमेळ बिघडला आहे. शेंगदाण्याच्या किंमतीही वधारल्याआहेत.

गव्हाच्या दरांतही वाढ
दिवाळीनंतर गव्हाच्या दरांतही किलोमागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे. मध्ये प्रदेशातून येणारा सिहोर, तसेच स्थानिक गहू दिवाळीत २० ते २२ रुपये होता, तो आता २४ ते २५ रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. 

चहाचा तजेलाही महागला
चहाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचे दरही प्रचंड वाढले आहेत. दिवाळीनंतर किलोमागे ४० ते ५० रुपये वाढ झाल्यामुळे चहाचा तजेला महागला आहे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून चहाचे दर वाढतेच आहेत. दिवाळीदरम्यान सव्वाचारशे ते साडेचारशे रुपये किलोदरम्यान असलेला पॅकिंग चहा पाचशे रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. गणेशोत्सवात गगनाला भिडलेले कापराचे दर आता काहीसे खाली आले असून, तो हजार तु बाराशे रुपयांवर गेला आहे.

डाळींचे दर स्थिर
दिवाळीदरम्यान डाळीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर मागणी काहीशी कमी झाल्याने डाळींचे दर स्थिर आहेत. साखर, पोहे, साबुदाणा, रवा, हरभराडाळ, मूगडाळ आदींच्या दरांतही फारसा फरक पडलेला नाही. पॅकिंग खोबरेल तेल मात्र दोन रुपयांनी महागले आहे.

वस्तू किलोचे दर (रुपयांत)
साखर ३७ - ३८
सोयाबीन तेल १०७ ते ११०
सूर्यफूल तेल १२० ते १३२
तूप (डालडा) ८५
रवा ४०
मैदा ३०
हरभराडाळ ७५
शेंगदाणा ११० ते ११५
साखर ३५
मूगडाळ १००
तूरडाळ १०५
मिरची २५० ते २८०
खोबरे २३० ते २४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT