file photo 
नांदेड

सचखंड गुरूद्वारा : सव्वासे कोटीचे अंदाजपत्रक मंजूर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सचखंड गुरुद्वारा बोर्डाची अंदाजपत्रकीय बैठक सरदार भुपिंदरसिंग मनहास यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. सहा) सकाळी ११ वाजता मुंबई येथून व्हिडिओ कॉनफ्रन्सिंगद्वारे घेण्यात आली. या बैठकीत १२५ कोटी ८८ लाखाच्या (सन २०२०-२१) अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. 

बोर्डातर्फे जे नविन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत ते लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या वर्तमानकाळात कोरोनाचे भयानक संकट संबंध जगावर घोंगावत आहे. त्याचा फटका येथील सचखंड गुरूद्वारालाही बसत आहे. त्यामुळे गुरूद्वाराच्या आर्थीक परिस्थितीमध्ये फार मोठी तफावत येणार आहे. यासाठी सर्वांनी गांभीर्याने विचार करुन सर्व सदस्यांना या संकट स्थितीमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

राशी देऊन सहकार्य करावे

जगभरात भाविकांना निवेदन करण्यात आले आहे की, या प्रस्तावित माता गुजरीजी यात्री निवास व इत्यादी प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त भेट राशी देऊन सहकार्य करावे यासाठी गुरुद्वारा बोर्डाच्या वेबसाईटवर सर्व माहिती टाकण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली. तसेच यु- ट्यूब, फेसबुकद्वारे प्रचार, प्रसार करण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर दररोजच्या कथामध्येही निवेदन करण्यात येत आहे. 

बैठकीमध्ये मंजूर प्रस्ताव

१६ जानेवारी २०२० ची बैठकीच्या कारवाईला मान्यता, आर्थीक वर्ष २०२०- २१ चा अंदाजपत्रक (बजट) १२५ कोटी ८८ लाखाला मान्यता, गुरुद्वारा बोर्डातर्फे कोरोना प्रादूर्भाव (लॉकडाउन) वेळी सुमारे २८ लाख ४१ हजार रुपयांचे खाद्य पाकीट नांदेड शहरासह मराठवाड्यात वितरीत करण्यात आली होती. त्या खर्चास मान्यता देण्यात आली, गुरुद्वारा बोर्डाच्या पाठीसिंघाच्या भेटीमध्ये वाढ करण्यात आली आणि सचखंड साहिबचे सहाय्यक ग्रंथी (मीत ग्रंथी) या पदावर स. गुरमितसिंग राजींद्रसिंग पुजारी यांना पदोन्नती देण्यात आली. 

यांची होती उपस्थिती

बैठकीचे संचलन स. परमज्योतसिंग चाहेल यांनी केले. बोर्ड अधीक्षक स. गुरविंदरसिंग वाधवा व लेखापाल स. शरणसिंग सोडी यांनी सादरीकरण केले. या बैठकीला अध्यक्ष स. भुपिंदरसिंग मनहास, उपाध्यक्ष स. गुरविंदरसिंग बावा, सचीव रविंदरसिंग बुंगई, सदस्य स. गोविंदसिंग लोंगोवाल, स. रघुजीतसिंग विर्क, गुरदीपसिंग भाटीया, सरदुलसिंग फौजी यांची उपस्थिती होती. बैठकिच्या सुरवातीला समाजातील निधन पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT