हाच तो सहस्र्कुंड धबधबा 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेला सहस्रकुंड धबधबा पहिल्याच पावसात ओसंडून

मराठवाडा विदर्भ सीमेवरुन वाहणारी पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा हा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील ईस्लापूरपासुन पाच किलोमीटर अंतरावर आकर्षक, रमणीय व नैसर्गिक सौंदर्याने नटलेले सुंदर पर्यटनस्थळ आहे.

गंगाराम गड्डमवार

ईस्लापूर ( जिल्हा नांदेड ) : मराठवाडा- विदर्भ सीमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड (जिल्हा नांदेड) धबधबा पहिल्याच पावसाने ओसंडून वाहू लागला. किनवट तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनाही मोह आवरला नसल्याने यांनी सुध्दा निसर्गरम्य पर्यटनस्थळ सहस्रकुंड धबधब्याला भेट देवून नैसर्गिक सौंदर्याचा आंनद घेतला. तसेच येथील प्रशासनाला योग्य त्या सुचना दिल्या. येणाऱ्या पर्यटकाला धबधब्यापर्यंत जावू देऊ नका, कारण यापूर्वी अनेक दुर्घटना या ठिकणी घडलेल्या आहेत. त्या टाळण्यासाठी सावधगीरीने कर्तवय पार पाडण्याचा सल्ला दिला.

मराठवाडा विदर्भ सीमेवरुन वाहणारी पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा हा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील ईस्लापूरपासुन पाच किलोमीटर अंतरावर आकर्षक, रमणीय व नैसर्गिक सौंदर्याने नटलेले सुंदर पर्यटनस्थळ आहे. हे पर्यटनस्थळ म्हणजे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याची शान असुन पावसाळा सुरु झाला की या धबधब्याचे सहस्रधारा दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांचे पाउल आपोआप पर्यटनस्थळाकडे ओढतात.

हेही वाचा - किनवट तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चालु असलेल्या महामार्गाच्या पुलांच्या कामादरम्यान निर्माण केलेल्या बाजुचे प्रासंगिक पुल वाहुन गेल्याने वाहतुक खोळंबली

या वर्षी पहिल्याच पावसाने पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. किनवट तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनाही मोह आवरला नसल्याने या नयनरम्य नैसर्गिक पर्यटनस्थळाला भेट देवून धबधब्याचा आंनद घेतला. या प्रसंगी येथील पैनगंगा ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सोई सुविधा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT