file photo
file photo 
नांदेड

मुदखेड तालुक्यात गोदावरी पात्रातून वाळू उपसा सुरुच

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मुदखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी व आसना नदीपात्रातून विविध ठिकाणाहून तराफ्याद्वारे अवैध वाळू उत्खनन सुरुच आहे. त्याकडे स्थानिक महसूल व पोलिस प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

मुदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्राह्मणवाडा आणि अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिंपळगाव, दिग्रस आदी भागातून आसना व गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत असून हरभरा व गहू तसेच तुरीवर वाहनामुळे उडालेल्या मातीचे थर बसत आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा वाळू माफियांमुळे अडचणीत आले आहेत.

ब्राह्मणवाडा गावाच्या शेजारी असलेल्या गुरुद्वारा हिराघाट या परिसरासह भवानी मंदिर आजूबाजूला शेजारी तसेच शेत शिवारात गोदावरी नदीपात्रातून रसुट्टीच्या दिवशी अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु असते. उपसा केलेली वाळू मोठ्याप्रमाणावर साठवण करुन चढ्या भावाने काळअया बाजारात विकल्या जात आहे. त्यामुळे गरजु घरकाम करणाऱ्यांना वाळूमुळे मोठा फटका बसत आहे. 

तसेच अर्धापूर तालुक्यातपिंपळगाव (महादेव), नांदला दिग्रस या ठिकाणाहून हायवा, टिप्परच्या माध्यमातून वाळू वाहतूक केल्या जात आहे. सध्या अवैध वाळू उत्खनन बोटिंगद्वारे नकरता तराफ्याद्वारे गोदावरी नदीपात्रात होत आहे. दिवसाढवळ्या हजारो ब्रास वाळू अवैध उत्खनन ब्राह्मणवाडा, त्रिकूट, वाडी, बोंढार, नागापूर, पुणेगाव, वासरी यासह अन्य भागात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT