नांदेड

नांदेड : ‘पाणी वाचवा’ उपक्रमाला हरताळ...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : ‘पाणी जपून वापरा’, ‘काटकसर करा’, पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय टाळा असे सल्ले आपण नेहमीच ऐकतो पण गेल्या चार पेक्षा जास्त वर्षांपासून होणारी लाखो लीटर पाणी गळती रोखण्यात सबंधित विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून (vishnupuri project) कालव्यात सोडण्यासाठी पाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइन मधून रात्रंदिवस पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असूनही ती थांबविण्यासाठी प्रशासनाने जुगाड लावण्याच्या पलीकडे कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत.

हंडाभर पाण्यासाठी आजही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी महिलांना पायपीट करावी लागते, तर दुसरीकडे विष्णुपुरी जवळ असलेल्या पाइपलाइनला अनेक ठिकाणी गळती लागल्याने विनाकारण पाणी वाया जात आहे. ग्रामीण भागाचे होणारे हाल, तसेच शहरी भागात विस्कळित होणारा पाणीपुरवठा पाहता कोणत्याही प्रकारे वाया जाणारे पाणी रोखणे प्रशासनाची जबाबदारी आहे. असे असताना गेली काही वर्षे हीच परिस्थिती आहे.

विष्णुपुरी प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वांत मोठा माती बंधारा आहे. या उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात हजारो हेक्‍टर जमीन येते. या प्रकल्पातून पाणी उपसून असदवन शिवारात अंदाजे तीन किलोमीटर पर्यंत मोठ्या पाइपलाइनद्वारे नेले जाते. त्यापैकी कधी एक, कधी दोन, तर कधी तीन पाइपलाइनद्वारे वाहून नेले जाणारे पाणी असदवन येथे एका मोठ्या हौदाच्या आकाराच्या जलाशयात सोडले जाते. त्यातून हे पाणी कालव्यात सोडले जाते. त्याद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी सोडले जाते. दरम्यान ज्या-ज्या वेळी या पाइपलाइन मधून पाणी सोडल्या जाते त्या-त्यावेळी ही पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत असते. हा प्रकार गेल्या काही वर्षांहून अधिक काळ सुरू आहे.

पाणी आवर्तन सोडल्याच्या या कालावधीत दररोज रात्रंदिवस लाखो लीटर पाणी वाया जात आहे. एका गावाची तहान भागेल एवढे पाणी विनाकारण वाया जात आहे. हे पाणी मुख्य ठिकाणी पोहोचत असताना सुरुवातीपासूनच पाइपलाइनलाच मोठ्या प्रमाणात गळती होत त्यानंतर ते पोहचते. आजूबाजूला छोट्या मोठ्या तलावाचे स्वरूप पहावयास मिळते. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या या गळतीमुळे किती टक्के पाण्याची गळती होते ते सांगणे कठीण असून आजतागत पाण्याची गळती थांबवू शकले नाहीत. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर विनाकारण वाहून जाणारे पाणी सर्वासाठी चिंता निर्माण करणारे आहे.

पाण्यासाठी वणवण कोसोदूर भटकणाऱ्या महिला, पुरुष, मुले, प्रौढ, घागरभर पाण्यासाठी तास न तास रांगेत उभे राहणे, प्रसंगी पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून अनेकांनी जीव गमावलेच्या घटना घडल्या आहेत. आठ-आठ दिवस पाणी टंचाई पण पाहिली असून ग्रामीण तंत्रनिकेतन विष्णुपुरी जवळील होत असलेली पाण्याची नासाडी हे कोणाचे दुर्दैव म्हणावे? अनेक ठिकाणी पाईपला गळती होत असल्याचे माहित असतानाही पाणी गळती थांबवण्याच्या मुद्यावर कोणीच गांभीर्याने घेत नाही हे विशेष.

सिंचन विभागाला गांभीर्य दिसत नाही

गळती लागलेल्या पाइपलाइनची किरकोळ स्वरूपाची दुरूस्ती करून त्या ठिकाणी पोते बांधून तात्पुरती जुगाड करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न मात्र झालेला दिसत आहे. या प्रकल्पातूनच सिडको-वाघाळा नांदेड शहराला पाणीपुरवठा केला जातो. जलसाठा चांगला असला तरी तो अखेरपर्यंत पुरेल याची शाश्‍वती नाही. या पार्श्‍वभूमीवर विष्णुपुरी प्रकल्पातील पाण्याचे काटेकोर नियोजन होणे गरजेचे आहे. पण, पाइपलाइनमधून अखंड रात्रदिवस लाखो लिटर पाणी गळतीमुळे वाया जात असतानाही सिंचन विभागाला त्याचे गांभीर्य दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT