नांदेड : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी शासनाने लागू केलेल्या लॉकडाउनमुळे अनेक व्यवसायांना फटका बसला आहे. यात गर्दी होणारी ठिकाणी अद्यापही बंद असल्याने शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, उपहारगृह, अभ्यासिका बंद आहेत. यामुळे ग्रामिण भागातून मोठे कष्ट सोसत शहरात शिक्षणासाठी आलेल्यांनी ‘गड्या आता, आपला गावच बरा’ म्हणत खेड्याचा रस्ता धरला आहे. यामुळे घरभाड्यातून कैक हजारो कमविणाऱ्यांचे अनेक घरे आता रिकामी झाल्याने घर भाड्याने देणे आहे, अशा पाट्या लागल्या आहेत.
अडीच महिन्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’
जागतीक महामारी कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये, यासाठी केंद्र शासनाने टाळेबंदीची घोषणा केली. मार्च महिन्यातील २३ तारखेपासून गर्दी होणारी सर्वच ठिकाणे बंद केले. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. पहिल्या टप्यातील टाळेबंदीनंतर ठरविक दिवसाने यात वाढ होवून तब्बल दोन महिने बाजार बंद राहिला. यानंतर शासनाने काही व्यवहार सूरु करण्याची परवानगी दिली. परंतु अद्यापही शैक्षणिक संस्था, खाणावळी, उपहारगृह, खासगी शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था, अभ्यासिका बंद आहेत. दोन महिने कसेबसे शहरात काढल्यावर नजिकच्या काळातही हा व्यवहार सूरु होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. यामुळे नांदेड परिसरासह अनेक जिल्ह्यातून शिक्षण व व्यवसायासाठी आलेल्यांनी शहर सोडायला सूरवात केली आहे.
हेही वाचा....सोमवारपासून ‘असे’ चालणार न्यायालयीन कामकाज
नांदेड शहर बनले शैक्षणिक हब
अलिकडच्या काळात नांदेड शहर शैक्षणिक हब बनले होते. या ठिकाणी मेडीकल, अभियांत्रीकी तसेच सत्सम व्यवसायीक शिक्षणासाठी दर्जेदार शिकवणी वर्ग सुरु होते. याचा लौकीक पूर्ण राज्यात परसरल्याने अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी नांदेडला येतात. यामुळे शहरातील कोणत्याही भागात घर सदनिका या विद्यार्थांसाठी उभारल्या आहेत.
हेही वाचलेच पाहिजे.....Video - वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा
अद्ययावत वसतीगृहाची उभारणी
यासोबतच काहींनी घर अथवा सदनिका घेण्याएवजी निवासासाठी अद्ययावत वसतीगृहाची निवड केली. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वसतीगृह उभारले आहेत. यात मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था असलेल्या वसतीगृहाची संख्या लक्षणीय आहे. यासोबतच या मुलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी खाणावळीची संख्याही मोठी होती. या सर्वांना राहण्यासाठी घरे तसेच दुकानांची गरज असल्याने अनेकांनी तसे बांधकामही केले आहे. परंतु एका विषाणूने सर्वांचेच मनसुबे उधळून लावल्यामुळे आज शहर सुने-सुने झाले आहे.
घरासमोर लागल्या पाट्या
लॉकडाउनच्या काळात दोन महिने कसे-बसे काढल्यानंतर सर्व सुरळीत होइल, असे वाटणाऱ्यांचे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने आवसान गळाले आहे. नजिकच्या काळात लवकर व्यवहार सुरळीत होतील, अशी शक्यता दिसत नसल्याने अनेकांनी घर खाली करण्याचा सपाटा लावला आहे. शहरातील काही ठराविक भागात भाड्याने राहणे म्हणजे प्रतिष्ठा समजली जात होती. त्या भागातील घरेही खाली होत आहेत. तर काही सुजान घरमालकांनी भाड्यात सवलत दिली आहे. त्यामुळे काही भाडेकरु टिकून आहेत. तर मस्तवाल घरमालकांचा तोरा कायम आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्राप्रमाणे घरमालकांनाही जमिनीवर आनल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.