File photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शाळांचा पालकांवर दबाव, शुल्क दिले तरच घेणार परीक्षा 

प्रमोद चौधरी

नांदेड : शहर आणि जिल्ह्यात शाळांकडून शुल्क वसुलीसाठी पालकांवर दबाव आणला जात आहे. शुल्क दिले तरच परीक्षा देता येणार अशी अट इंग्रजी तसेच मराठी माध्यमांच्या काही शाळांनी पालकांसमोर ठेवली आहे. एक तासाच्या आॅनलाइन शिक्षणासाठी पूर्ण शुल्क वसुली केली जात असतानाही शिक्षण विभाग मात्र, पालकांच्या तक्रारींची वाट बघत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 

नवीन शैक्षणिक सत्रातील शाळा सुरु झाल्यापासूनच काही शाळा शैक्षणिक शुल्कासाठी पालकांची अडवणूक करत आहेत. फीस संदर्भात काही तक्रारीसुद्धा शिक्षण विभागाकडे सुरुवातीच्या काळात प्राप्त झाल्याचे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. परंतु, त्या तक्रारी तोंडी असल्याने त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. विनाअनुदानित शाळेने इस्टॉलमेंटवर शुल्क घ्यावे, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या, असे या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत देण्याच्या सूचना असतानाही शाळांकडून शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावला जात असल्याने पालकांसोबतच विद्यार्थीही त्रस्त झाले आहेत. 

आॅनलाइन वर्ग, स्थानिक केबल नेटवर्कचा आधार घेऊन शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करणे आदी प्रयोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. मराठी, इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी २०२० - २०२१ या शैक्षणिक वर्षासाठी आॅनलाइन प्रवेश घेऊन आॅनलाइनच शिक्षण सुरु केलेले आहे. एक तासाच्या आॅनलाइन शिक्षणासाठी पूर्ण शुल्क वसुल करण्यात येत आहे. परीक्षा देण्यासाठी पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावला जात असल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. 

शिक्षकांचे पगार कसे करायचे? 
आॅनलाइन अध्यापन असले तरी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांना पूर्ण वेळ शाळेत थांबविण्यात येते. त्यामुळे शुल्क वसुलीबाबत शाळेशी संपर्क साधला असता आम्ही शिक्षकांचे पगार कसे करायचे? असा प्रश्न इंग्रजी माध्यमच्या शाळेतील एका प्राचार्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर उपस्थित केला. 

४५ मिनिटांच्या शिक्षणासाठी पूर्ण शुल्क 
शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबायला नको, यासाठी राज्य शासनाने आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय शाळांसमोर ठेवला. त्यानुसार जिल्ह्यातील खासगी इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांनी आॅनलाइन शिक्षण सुरु केलेले आहे. परंतु काही शाळांकडून दिवसाला केवळ एक तास आॅनलाइन शिक्षण दिले जात असताना पूर्ण शुल्क घेतले जात आहे. 

आदेशाची अवहेलना 
कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले होते. सर्वसामान्यांची आर्थिक आवक बंद झाली होती. त्यामुळे फीससाठी शाळांनी अडवणूक करू नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. परंतु, शैक्षणिक संस्था या आदेशाला न जुमानता फी मुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखत आहेत. 
- प्रकाशराव जोशी, पालक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

SCROLL FOR NEXT