File Photo 
नांदेड

बचत गटांना लवकरच मिळणार मिनी ट्रॅक्टर

सकाळ वृत्तसेवा


नांदेड : अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ९० टक्के अनुदानावर नऊ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर, त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याच्या योजनेंतर्गत एकूण १५३ बचत गट पात्र झाले आहेत. पात्र, लाभार्थींना ईश्वरचिठ्ठीने बचत गटांपैकीच निवड होणार असून सोडतीची वेळ आणि तारीख यथावकाश लवकर कळविण्यात येणार असल्याचे नांदेडचे समाज कल्याण सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी माहिती दिली.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ९० टक्के अनुदानावर  नऊ ते १८ अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे.

लाभाचे हस्तांतर रोख स्वरूपात​

शासन निर्णय (ता. आठ) मार्च २०१७  अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरूपात थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्रुटींची पूर्तता करण्यासाठी यापूर्वीच चार वेळा संधी​

सन २०१८-१९ या वर्षात ज्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी अर्ज केला  होता. त्या सर्व अर्जांची तपासणी केली असता अर्जात त्रुटी आढळून आल्या असून एकूण १५३ बचत गटांनी त्रुटींची पूर्तता केली आहे. पात्र व अपात्र बचत गटांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे. अर्ज केलेल्या सर्व बचत गटांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी यापूर्वीच चार वेळा संधी देण्यात आली होती. पहिली संधी (ता. दहा) जुलै २०१९ पर्यंत, तर दुसरी १२ डिसेंबर २०१९ पर्यंत व तिसरी संधी ३० डिसेंबर २०१९ पर्यंत आणि चौथी संधी १४ फेब्रुवारी २०२० पर्यंत देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharmas 2026: 15 मार्चपासून बदलणार ग्रहस्थिती! सूर्य मीन राशीत; का करू नयेत शुभ काम?

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

SCROLL FOR NEXT