file photo 
नांदेड

खळबळ : वाळू माफियांचा पोलिस पथकावर प्राणघातक हल्ला, एक गंभीर

मिलींद सरपे

किनवट : कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवत रेती तस्करांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. यातील एका पोलिसाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी( ता. १९) रात्री साडेअकराच्या सुमारास दाभाडी (ता. किनवट) या गावाजवळ असलेल्या नाल्यावर रात्री घडली.

या प्रकरणी पोलिस नाईक गजानन रामदास चौधरी (वय ३९) यांच्या फिर्यादीवरून शनिवारी (ता.२०) किनवट पोलिस स्टेशनला दाभाडी येथील १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी असलेले पोलिस कर्मचारी श्री. राठोड यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपीपैकी सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच भोकर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

मनोहर दबडे, अविनाश दबडे, अमरनाथ दबडे, ज्ञानदेव जगदीश खांडेकर, विठ्ठल गणपत आमनर, दीपक सिकालकर, रुपेश चिकालवार, साईनाथ शामराव गजभारे, महादेव अंकुश पांढरे, बाबुराव प्रभू वाळेकर, अजय मनोहर दबडे, ज्ञानेश्वर लक्ष्मण शिंदे, किरणबाई मनोहर दबडे, कानुपात्रा अमरनाथ दबडे, प्रभा नामदेव दबडे व इतर दोन पुरुष राहणार सर्व दाभाडी (ता. किनवट) येथील रहिवासी आहेत.

एक पोलिस गंभीर जखमी

फिर्यादी व साक्षीदार असे मिळून वाळू चोरी प्रतिबंध करण्याकरिता लोकसेवक या नात्याने त्यांची शासकीय कर्तव्य बजावीत असताना शुक्रवारी (ता. १९) रोजी रात्रीच्या अकरा ते साडेअकराच्या सुमारास दाभाडी (ता. किनवट) या गावी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने संगनमत करून जिल्हाधिकारी नांदेड यांच्या जमावबंदीचे व हत्यारबंदीचे आदेश लागू असतांना त्याचे उल्लंघन करून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून, सशस्त्र होऊन साक्षीदार हवालदार श्री. राठोड यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी व सोबतचे कर्तव्यावरील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना लाकडी दांड्याने, काठीने व दगड फेकून मारून जखमी केले. तसेच रस्ता अडवून अटकाव केला. साक्षीदार सुरेश कोलबुधे यांचा मोबाइल फोडून नऊ हजार रुपयांचे नुकसान केले.

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस, अवैध उपसा सुरूच
 
किवनट पोलिस ठाण्यात गुन्हा 

या प्रकरणी पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे तपास करत आहेत. या घटनेतील सतरा आरोपींपैकी पोलिसांनी आज (ता. २०)  मनोहर दबडे, अविनाश दबडे, अमरनाथ दबडे, ज्ञानदेव जगदीश खांडेकर,  महादेव अंकुश पांढरे, अजय मनोहर दबडे व ज्ञानेश्वर लक्ष्मण शिंदे या सात आरोपींना अटक केली आहे.

चौकट

पोलिसांवर हल्ला करणे ही गंभीर बाब आहे. यात कांही महिलांचाही समावेश आहे आरोपींमध्ये महिला असल्या तरी त्यांची गय केली जाणार नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT