file photo 
नांदेड

खळबळजनक घटना : नांदेडचे कारागृह पुन्हा आले चर्चेत, चक्क कैद्याकडे सापडला मोबाईल 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील कारागृह मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत येत आहे. एक महिण्यापूर्वी कारागृह अधीक्षक यांना तुरुंगाधिकाऱ्यांनी शिविगाळ व धक्काबुक्की केली होती. या प्रकरणात दोन्ही तुरुंगाधिकारी सध्या निलंबीत असून नुकताच त्यांना अटकपूर्व जामिन मिळाला आहे. हा गंभीर प्रकार ताजा असतांनाच पुन्हा याच कारागृहात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तो म्हणजे चक्क कैद्याकडे मोबाईल सापडला. या कैद्याविरुद्ध तुरुंग प्रशानाच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात ता. २९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा हे कारागृह चांगलेच चर्चेत आलेआहे.

नांदेडच्या कारागृहात एका गंभीर गुन्ह्यात बंदी असलेल्या दोन कैद्यांनी संगनमत करुन आपल्या नातेवाईक किंवा कारागृहातील एखाद्या कर्मचाऱ्यामार्फत मोबाईल मिळविला. या मोबाईलवरुन ते कारागृहाबाहेरील मित्रांना संपर्क साधून नविन गुन्हे करण्यास परावत करीत होते. हा धक्कादायक प्रकार गस्तीवर अशलेल्या एका कारागृह पोलिस कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगुन कैद्याकडील मोबाईल जप्त केला. कर्मचारी सय्यद अली शेर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हा प्रकार ता. २६ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास तुरुंगातील बॅरेक क्रमांक तीनमध्ये दिनेश बालाजी परसे आणि परमजीतसिंग हे दोघे आपल्याकडील मोबाईलवरून बाहेरच्या लोकांना बोलताना सापडले होते. त्यांच्याकडून मोबाईल जप्त करुन कट रचणे, यासोबत भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ आणि १२० अधिनियम ४२ आणि ४५ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास वजिराबाद पोलिस करत आहेत. तुरुंगात बंद्यांना मोबाईल वापरण्यासाठी बंदी असताना त्यांच्याकडे मोबाईल कसा आला हा एक मोठा विषय असून त्याचाही शोध घेण्याची गरज आहे. तुरुंगात बसून बाहेर काही गुन्हे घडविण्याचा प्रकार असेल काय याचा तपास वजिराबाद पोलिस करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT