file photo 
नांदेड

महागाई विरोधात काढलेल्या शिवसेनेच्या बैलगाडी मोर्चाने नांदेड दणाणले

प्रल्हाद कांबळे

नांदेड : केंद्र सरकाच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशावरुन व संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शाखाली शुक्रवारी (ता. पाच) फेब्रुवारी सकाळी ११ वाजता जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्चात प्रचंड घोषणाबाजी करुन सरकारच्या विरोधात निषेधाचे फलक दाखविण्यात आले.

या मोर्चामुळे नांदेड शहर चांगलेच दणाणून गेले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद तिडके, उमेश मुंडे, डाॅ. मनोज भंडारी, अशोक उमरेकर, महेश खेडकर आणि माधव पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांची झाली समयोचीत भाषणे

केंद्र सरकार देशआतील जनतेच्या तोंडाला पाणी पुसत आहे. हे सराक बोलघेवड्यांचे असून त्यांना जमिनीवर आणण्यासाठी राज्यसरकार खंबीर आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही महाराष्ट्रात हा कायदा येऊ देणार नाही. केंद्र सरकारला वठणीवर आणण्यासाठी यापुढेही मोठी आंदोलने छेडण्यात येती असा इशारा त्यांनी दिला.
-आमदार बालाजी कल्याणकर

अगोदरच देशातील शेतकरी कर्जबाजारी असून त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देणे तर सोडाच त्यांच्याच विरोधात जाचक कृषी कायदा आणून केंद्रसरकारने त्यांची थट्टा चालविली आहे. महाराष्ट्र राज्य या कायद्याला कुठेही थारा देणार नसून देशातील पेट्रोल, डिझेल व गॅस महागाई कमी केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. 
- जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे 

राज्यातील व देशातील हजारो तरुण बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम केंद्र सरकार देऊ शकले नाही. केंद्र सरकारच्या घोषणा म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असल्याची टिका केली. पंतप्रधान तरुणांची हेटाळणी करत आहेत. देशातील युवा शक्तीला रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. 
- उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख  

गॅस, डिझेल व पेट्रोल वाढ ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना आहे. उज्वला गॅस योजनेतून ग्रामीण भागातील महिलांना गॅस दिला परंतु त्यांच्याकडे तो भरण्यासठी पैसे नाहीत. त्यामुळे ही योजनाच कुचकामी ठरत आहे. देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी केंद्र सरकारने कमी करावी अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा दिला. 
- आनंद तिडके बोंढारकर, जिल्हाप्रमुख. 

केंद्र सरकारला इशारा देऊन देशात सुरु असलेली महागाईची अराजकता बंद करावी. शेतकऱ्याप्रती आपले प्रेम दाखवावे असे मत व्यक्त केले. शएतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी केली. 
- जयवंत कदम, तालुकाप्रमुख

या मोर्चामध्ये यांचा होता समावेश

जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद तिडके, उमेश मुंडे, डॉ. मनोजराज भंडारी, अशोक उमरेकर, सचिन किसवे, जयवंत कदम, महेश खेडकर, माधव पावडे, गौरव कोडगीरे, साईनाथ विभूते, नवनाथ काकडे, उद्धव पाटील शिंदे, रमेश वाघमारे, रावसाहेब महाराज धनेगावकर, रमेश पाटील कोकाटे, सत्यनारायण शर्मा, राजू गुंडमवार, राजू मोरे, राजू शेळके, विश्वास पाटील, सुरेश पावडे, गौतम जैन, मुन्ना राठोड, दीपक भोसले, अभिजीत भालके, राम कोळकर, बालाजी पावडे, चांदू बाराटे, मारुती पाटील, माधवराव कोकाटे, शाम वानखेडे, व्‍यंकटी कोकाटे, गजेंद्र ठाकूर, माधव वडगावकर, श्याम वाघमारे, कमलकिशोर पावडे, सय्यद खाजा मोहम्मद रहीम, राम कुलकर्णी, अवतारसिंग पहरेदार, प्रणव बोडखे, सुनील जाधव, शक्तीसिंग ठाकूर, साई कावडे, गजानन धुमाळ, नवज्योतसिंग गाडीवाले, दीपक जोगदंड, बालाजी सूर्यवंशी, मोहमद ईस्माईल खान, समदखान शेख फिरोज, कुंवरचंद यादव, राजू यादव, शिवलिंग कोल्हापुरे, शामराव कदम, विजय कल्याणकर, तुकाराम पवार, संजय कुरे, केशव कल्याणकर, बळवंत तेलंग, मनोज ठाकूर, बालाजी भायेगावकर, प्रकाश जोंधळे, गंगाधर देशमुख, बालाजी गाडेकर यांच्यासह आदी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT