लसीकरणाचा वेग वाढला 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात सहा लाख चार हजार लसीकरण

जिल्हा आरोग्य विभागातर्फे १८ ते ४४ वयोगटासह ४५ वर्षावरील व्यक्तींना कोविशील्डचा पहिला आणि दुसरा डोस तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : आरोग्य विभाग, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १०२ लसीकरण केंद्रावर आत्तापर्यंत मंगळवारअखेर (ता. २९) सहा लाख चार हजार ७१ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर कोविशिल्डचे चार लाख ८९ हजार ९३० डोस तर कोव्हॅक्सीनचे एक लाख ४४ हजार ९६० डोस याप्रमाणे एकुण सहा लाख ३४ हजार ८९० डोस प्राप्त झाले आहेत.

जिल्हा आरोग्य विभागातर्फे १८ ते ४४ वयोगटासह ४५ वर्षावरील व्यक्तींना कोविशील्डचा पहिला आणि दुसरा डोस तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. नांदेड महापालिका हद्दीतील श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल येथे कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी शंभर डोस उपलब्ध आहेत. या ठिकाणी १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस दिला जाईल. तर शहरी दवाखाना जंगमवाडी व रेल्वे हॉस्पिटल येथे कोविशील्डचा १८ ते ४४ वयोगट आणि ४५ वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस दिला जाईल.

हेही वाचा - सचिन-विराटचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आलाय

जिल्ह्यातील शहरी भागातील उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, मांडवी, माहूर, उमरी या सात केंद्रावर कोविशील्ड लसीचे केंद्रनिहाय प्रत्येकी शंभर डोस तर ग्रामीण रुग्णालय मुदखेड, कंधार या दोन केंद्रावर प्रत्येकी ५० डोस उपलब्ध आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण १५ केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे केंद्रनिहाय प्रत्येकी शंभर डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे ५० डोस उपलब्ध आहेत.

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या १२ ते १६ आठवडे म्हणजेच सुमारे ८४ दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. कोविशील्ड लस १८ ते ४४ वयोगटासाठी व ४५ वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. तसेच कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी १८ ते ४४ व ४५ वर्षावरील वयोगटासाठी फक्त दुसरा डोस घेण्यासाठी ऑनलाइन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहील. महापालिका कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.

- डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार...

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Nashik News : नाशिक रोड परिसरात धक्कादायक घटना: मुंबई-हावडा एक्सप्रेसखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलाने जीवन संपवले

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

SCROLL FOR NEXT