बरडशेवाळा ( ता. हदगाव, जिल्हा नांदेड ) : गेल्या पंधरा महिन्यांपासून कोरोना आजाराने (Corona virus) थैमान घातले असल्याने शहरासह ग्रामीण भागात हाताला काम नसल्याने सर्व सामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित अडचणीत आले आहेत. हदगांव तालुक्यासह बरडशेवाळा, बामणी फाटा, पळसा, मनाठा परीसरात खबरदारी घेत सोयीनुसार छोटेखानी विवाह पार पडत (small wedding programe) असल्याने पूजा भजने यांची मुलगी अंजलीचा विवाह जुळला. भजने कुटुंबातील प्रमुख व्यक्ती अंजलीचे आजोबा गणा माळकरी यांचे एका महिन्यांपूर्वी निधन झाले होते. भजने कुटुंब रोज मजुरी करून कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालवतात. (Social Commitment: WhatsApp group helps Anjali's marriage)
प्रत्येक मुलीला आपल्या विवाहाला काही तरी साहित्य असावे असे वाटते पण काही ठिकाणी परीस्थितीमुळे शक्य नसल्याची परिस्थिती भजने कुटुंबाची झाली असल्याने व वाढती महागाई व साहित्य जुळवाजुळव होत नसल्याने गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अंजली भजनेच्या विवाहाची माहिती गावातील ग्रुपमध्ये मोबाईल संदेशांद्वारे करीत कन्यादानासाठी आवाहन केले होते.
हेही वाचा - "कोरोना काळात वृद्ध कलाकारांचे होत आहेत हाल"
आपल्या जन्मभुमीसाठी समाजाचे काही तरी देण आहे. या विचाराने बरडशेवाळा येथील अनेक सामाजिक कार्यात सहभागी होणारे डॉ. शिवाजीराव पोले ( औरंगाबाद ) व डॉ. मंगेश मस्के बालरोग तज्ञ यांच्या योगदानाला एका गरजु कुटुंबातील विवाहाला आधार मिळावा. यासाठी मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक पावडे, डॉ. एस. एम. मानसपुरे, विद्युत वितरण कंपनी कर्मचारी वर्ग बरडशेवाळा, आनंदराव मस्के, सुभाषराव मस्के, कपील नाईक, अशोक कदम, दिनेश दहीभाते, सोनबाराव मस्के, ज्ञानेश्वर किशन मस्के व दोन गुप्त दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीने बामणी फाटा येथील ईजळकर यांचे कृष्णा भांडी सेंटरने सामाजिक उपक्रमात सहभागी होत.
विवाहाला लागणारे सर्व संसार उपयोगी साहित्य योग्य दरात दिले. तर जिवनाश्यक वस्तू साखर, तेल, गहू, तांदूळ असे साहित्य खरेदी करुन भजने कुटुंबाला मदत देताना कोणताही गाजावाजा न करता कोणताही चेहरा समोर न येता विवाहाला चार दिवस बाकी असताना भजने कुटुंबाच्या घरपोच साहित्य देण्यात आले. या मिळालेल्या साहित्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता मोबाईल संदेशांद्वारे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दानशूर व्यक्तींनी दिलेल्या योगदानाने गरजु कुटुंबाला आधार मिळावा असल्याने या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले जात आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.