शेतकरी पुत्र धडकले कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे 
नांदेड

पिक विम्यासाठी नायगाव तालुक्यातील शेतकरी पुत्र पोहचले कृषी आयुक्ताकडे

खरीप हंगाम २०२० सालचे सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, ज्वारी यासह आदी पिकांचा पिक विमा इफको टोकियो कंपनीकडे नायगांव तालुक्यातील शेतक-यांनी भरला होता.

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० सालचा सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, ज्वारी यासह आदी पिकांचा पिक विमा मंजूर करावा. इफको टोकीयो कंपनीने आपल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा. यासाठी नायगाव तालुक्यातील शेतकरी पुत्र थेट पुण्यात पोहचले असून कृषी आयुक्तांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन दिले आहे. सदर प्रकरणी आपण लक्ष घालावे अशी आग्रही मागणी केली आहे.

खरीप हंगाम २०२० सालचे सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, ज्वारी यासह आदी पिकांचा पिक विमा इफको टोकियो कंपनीकडे नायगांव तालुक्यातील शेतक-यांनी भरला होता. परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीन व तूर पिकाचे मोठे नुकसान झाले होते. कृषी आयुक्तांच्या ( ता. पाच ) मार्च २०२१ च्या पत्रान्वये महसुल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. यात नायगांव तालुक्यातील सर्व महसूल मंडळे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली होती.

हेही वाचा - 'उरी' फेम किर्ती कुल्हारी होणार पतीपासून विभक्त

सोयाबीन व तुर पिकाचे मोठे नुकसान होऊनही नायगाव तालुक्यातील सर्व महसुल मंडळे बाधीत क्षेत्र घोषीत असतानाही सरसकट पिक विमा न दिल्याने झाल्याने शेतकऱ्यात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणी कृषी आयुक्तांनी लक्ष वेधण्यासाठी नायगाव तालुक्यातील शेतकरी पुत्र माणिक चव्हाण, विठ्ठल बेळगे, बालाजी नायगावकर, कपिल बैस यांनी शुक्रवारी (ता. २५) थेट पुण्याचे कृषी आयुक्त कार्यालय गाठले असून आयुक्तांची भेट घेवून निवेदन दिले आहे.

येथे क्लिक करा - विधायक बातमी : पालावरच्या 650 कुटुंबातील महिलांचे चेहरे खुलले

पिक विम्यापोटी शेतक-यांनी कोट्यवधी रुपये भरले असतांना तुटपूंजी मदत देवून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. पिकविमा भरताना शेतक-यांना भूलथापा इफको टोकियो कंपनी दिल्याने त्यांच्या प्रेमळ आश्वासनाला शेतकरी मायबाप कोरोना महामारीत फसले. शेतकरी मायबापाची फसवणूक केल्याप्रकरणी इफको टोकियो कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावा. शासन नियमाप्रमाणे आणखी शेतकरी पात्र होतात याचे कारणे असे की नैसर्गिक आपत्ती फक्त तालुक्यातील काही शेतक-यांच्या शेतावर होऊ शकतो का? त्यामुळे तालुक्यातील सर्वच शेतक-यांचे पंचनामे ग्राह्य धरुन आयुक्तांनी तालुक्यातील सर्व शेतक-यांना पिकविमा मंजूर करुन शेतक-यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT