Nanded ST sakal
नांदेड

नांदेड : पुढील आठवड्यापासून 'एसटी' प्रवास सुरळीत होणार

नांदेड आगारातील सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मागील दोन महिण्यापेक्षा अधिक काळापासून एसटी (ST) कर्मचाऱ्यांचे विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन कामबंद आंदोलन (Protest)सुरु आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर आणि मिळकतीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यातुन बाहेर पडण्यासाठी वरिष्ठ स्तरावर युक्त्या लढवल्या जात आहेत. त्यास हळूहळू यश येताना दिसत आहे. नांदेड आगारातील(Nanded depot) पाच ते सहा कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे दिवसाला पाच बसेस धावत आहेत.

सध्या नांदेड आगारातील तीन वाहक एक चालक यांच्यासह इतर आगारातील चार वाहक आणि चार चालक नांदेड एसटी आगाराच्या मदतीला धावून आले आहेत. त्यामुळे आज मंगळवारी (ता.१८) पासून मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी बसेसच्या संख्येत वाढ होणार असून, यापूर्वी वाहन परिक्षक म्हणून कार्यरत असलेला एक व एक चालक कर्तव्यावर हजर होणार आहे. त्यामुळे सध्या होत असलेल्या १० फेऱ्या वाढवून मुख्य आगारातुन धावणाऱ्या बसेसच्या दिवसाच्या फेऱ्यांची संख्या दुपटीने वाढेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

दुसरीकडे आगारातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणात फेर बदल करण्यात आले असून, सोमवारी आगारातील सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रियापूर्ण झाली असून, त्यांच्या बदल्यांची आॅर्डर मंगळवारी (ता.१८) त्यांच्या हातात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांची संख्या वाढण्यासोबत बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेसच्या संख्येतही वाढ होणार आहे.(Nanded News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT