file photo 
नांदेड

परिक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची बाभळी बंधाऱ्यात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : एकीकडे परिक्षा नको म्हणणारे विद्यार्थी असून अनेकजण परिक्षेला दांडी मारतात. मात्र धर्माबाद येथील एका विद्यार्थ्याने चक्क परिक्षा रद्द झाल्याने गोदावरी नदीवर असलेल्या बाभळी बंधाऱ्यात आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. २७) सकाळी घडली.
 
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून राज्यातील शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणी वर्ग बंद आहेत. एन परिक्षेच्या काळातच कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला. त्यामुळे दहावी, बारावीसह सर्वच परिक्षा शासनाने रद्द केल्या. त्यामुळे काही विद्यार्थी खूष झाले तर काहींनी नाराजी व्यक्त केली. परंतु परिक्षा रद्द झाल्याच्या नैराशेतून शेख वसीम शेख मोईन (वय २४) रा. फुलेनगर, धर्माबाद याने बाभळी बंधाऱ्याच्या पुलावरून गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

धर्माबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

ही घटना शनिवारी (ता. २७) दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच धर्माबाद पोलिसांनी व त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह बंधाऱ्यातून बाहेर काढला. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी मोसीन शेख शेख मोईन यांच्या माहितीवरुन धर्माबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री. देवकांबळे करत आहेत. 

वकिलाचा मोबाईल जबरीने चोरला

नांदेड : रात्री फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका वकिलाचा मोबाईल त्यांच्या हातातून हिसकावून घेऊन दोन चोरट्यांनी लंपास केला. ही घटना एनआरआय यात्री निवास रस्‍त्यावर शुक्रवारी (ता. २६) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, खोब्रागडेनगरमध्ये राहणारे बुद्धरत्न गंगाधर कांबळे (वय ३४) हे रात्री साडेदहाच्या सुमारास अण्णाभाऊ साठे चौक ते एनआरआय यात्री निवास दरम्यान फेरफटका मारत होते. ते आपल्या हातात मोबाईल धरुन पायी परत जात असतांना पाठीमागून अनोळखी दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील १६ हजाराचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरीने चोरुन नेला. त्यानंतर बुद्धरत्न कांबळे यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. पन्हाळकर करत आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT