file photo 
नांदेड

इंग्रजी लिहिता येत नाही म्हणून विद्यार्थी मागे- सीईओ वर्षा ठाकूर

प्रमोद चौधरी

नांदेड ः विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजीत लिहिता येत नाही म्हणून ते मागे पडतात. कुठलीही भाषा ही सरावाने अंगवळणी पडते, म्हणून इंग्रजीचा अधिकाधिक सराव करुन घेण्यासाठी छोट्या गोष्टी, संभाषण, पत्र लेखन अशा कौशल्यावर भर देणारे अध्यापन शिक्षकांकडून अपेक्षित आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी व्यक्त केले. 
 
जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या विकास बैठकीत त्या सोमवारी (ता. एक) बोलत होत्या. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, निरंतरचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीकिशन देशमुख, अधिव्याख्याता चंद्रकांत धुमाळे, अतुल चंद्रमोरे, उमेश नरवाडे, अभय परिहार, ज्योत्स्ना धुतमल, चंद्रकांत धुमाळे, समग्र शिक्षाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विलास ढवळे, अर्चना बागवाले, ‘डायट’चे प्राचार्य रवींद्र आंबेकर, ज्येष्ठ अधिव्याख्याता जयश्री आठवले, माणिक जाधव, सुदर्शन चिटकुलवार आदी उपस्थित होते.

रुटीनमध्ये अडकून बसू नका

नाविन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास धरण्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. इंग्रजी भाषा आणि गणितात मुले मागे पडत आहेत. त्यासाठी मुलांच्या कुठल्या अडचणी आहेत त्या शाळास्तरावर शिक्षकांनी समजून घ्याव्यात. पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी शाळा भेटीदरम्यान या बाबी पाहणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळेत सुंदर ग्रंथालय असायला हवे. त्यात पुस्तकांचे वर्गीकरण केलेले असावे. माझा गाव सुंदर गाव या अंतर्गत सर्व गाव पातळीवर स्वच्छतेचे अभियान सुरु आहे. एकंदरीतच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी रुटीनमध्ये अडकू नये, अशी तंबीही सीईओ ठाकूर यांनी दिली.   

इंग्रजी भाषा अंगवळणी पडू द्या

जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांचे डुप्लिकेशनचे प्रमाण जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डबाबत काम होणे गरजेचे आहे. ज्यांनी याबाबत जाणीवपूर्वक चुका केल्या आहेत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होईल.
- वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजू शेट्टींना कन्नड भाषेतच बोलण्याचा आग्रह, मराठी बोलण्यास विरोध; कर्नाटकात शेतकरी नेत्याला बोलूच दिलं नाही, कन्नड संघटनांचा संताप

Pune Weather : पुणेकरांना मोठा दिलासा! सलग तीन दिवस पावसाची उघडीप कायम; मात्र तापमानाचा पारा ३० अंशावर

‘हेरा फेरी’चा हिरो आता बिझनेसमन! सुनील शेट्टीने जावई आणि ल्योकासोबत उभारला नवीन व्यवसाय, महिलांसाठी खास वस्तू आणली बाजारात

Maharashtra Rains: जुन्या पिढीपेक्षा आताची पिढी जास्त पावसाळे पाहतेय.. लांबलेल्या पावसामुळे सोशल मीडियावर मनोरंजक कॉमेंट्सची बससात

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

SCROLL FOR NEXT