nanded sakal
नांदेड

Nanded News : शेतकऱ्यांसाठी विदेश अभ्यास दौरा ; तीन फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

Nanded News : शेतकऱ्यांसाठी विदेश अभ्यास दौरा ; तीन फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विदेश अभ्यास दौरा जाहीर करण्यात आला असून याबाबत ता. तीन फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कृषी विभागामार्फत विविध देशांनी विकसित केलेली शेती विषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी केलेला अवलंब त्याद्वारे त्यांचे उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या - त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी घेण्यात येणार आहेत.

तसेच तेथील संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांच्या ज्ञान व क्षमता उंचविण्यासाठी राज्य पुरस्कृत योजना २०२३-२४ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे देशातील अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहेत. तरी कागदपत्रांची पुर्तता होत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभागाकडे संपर्क करुन आवश्यक कागदपत्रासह ता. तीन फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

विदेश अभ्यास दौऱ्यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यातून प्रत्येकी तीन यानुसार १०२ व राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार १८ असे एकूण १२० शेतकरी व सहा अधिकारी यांची निवड केली जाणार आहे. क्षेत्रीय स्तरावरील निवड प्रक्रिया पुर्ण करुन ता. पाच फेब्रुवारीपर्यंत शेतकरी याद्या कृषी आयुक्तालयाकडे सादर करण्याचे निर्देश असल्याचे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Update : राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT