file photo 
नांदेड

सक्सेस स्टोरी: अबब ! गोकुळमध्ये तब्बल १५२ सदस्यीय शेतकरी बचत गट

साजीद खान

वाई बाजार ( जि.नांदेड) : बचत गट म्हटलं, की प्रामुख्याने नजरसेमोर उभा राहतो ते महिलांचा बचत गट. मात्र आता पुरुषांचेही बचत गट तयार होत आहेत. माहूर तालुक्यातील गोकुळ येथे माजी सरपंच सुभाष डाखोरे यांच्या संकल्पनेतून महिलांच्या बरोबरीने चक्क पुरुष शेतकऱ्यांचे बळीराजा बचत गट निर्माण करण्यात आले. या गटाची सदस्य संख्या तब्बल १५२ इतकी असून प्रत्येकी पाच हजार रुपये इतकी बचत ठेव आहे. यातूनच गरजू शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. (ता. ३१) रोजी रात्री नऊ वाजता गटाची सर्वसाधारण सभा गोकुळ येथे पार पडल्यानंतर हे शेतकरी बचत गट प्रकाश झोतात आले आहे.

माहूर तालुक्यातील गोकुळ हे गाव नावाला जरी गोकुळ असेल तरी चहाला देखील दूध मिळत नव्हते. अर्थात शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड असते मात्र इथे शेतकऱ्याच्या नशिबी नेहमीच अठराविश्वे दारिद्र्यच. कापूस, तूर, सोयाबीन व हरभरा या नगदी पिकासह पारंपारिक पिकांच्या उत्पादनात नेहमीच अग्रेसर म्हणून परिसरात परिचत असायचे. परंतु काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी त्याचबरोबर रासायनिक खताचा अति वापरामुळे उत्पादकतेत मोठी घट होऊन येथील शेती व्यवसाय घाट्यात होत असे. शेतकर्‍यांना नेहमीच आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागते. शेतीमधून वर्षाकाठी जेमतेम उत्पादन हाती लागते. यामुळे शेती व्यवसाय तोट्याचा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील प्रयोगशील शेतकरी माजी सरपंच सुभाषराव डाखोरे यांनी पुढाकर घेत गावातील सुशिक्षीत तरुणांना एकत्र करुन गत वर्षी बळीराजा शेतकरी बचत गटाची स्थापना केली. 

बचत गटाच्या वाटचाली विषयी माहिती देतांना गटाचे प्रवर्तक सुभाष डाखोरे म्हणाले की, बचत गटात गावातील एकुण १५२ स्त्री- पुरुष शेतकर्‍यांचा सहभाग आहे. पाच हजार रुपये प्रत्येकी ठेव जमा करून त्याच पैशांमधून गरजू शेतकऱ्यांना सात लाख साठ हजार रुपये कर्ज वितरण केले आहेत. विविध शासकीय योजनांची माहिती आमच्या गावातील शेतकर्‍यांना या बचत गटाच्या माध्यमातून दिली जाते. भविष्यात कंपनी ऍक्‍टनुसार या गटाची नोंदणी करून बळीराजा बचत गटाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात संकल्प आहे. गटाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधी या नात्याने जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव व सरपंच मंगल हातमोडे, नावेद खान, कृषी सहाय्यक आथम थोरे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. 

यावेळी श्री. जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या योजना गोकुळ येथील बळीराजा गट समूहाला शक्य तेवढ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हंगामी अध्यक्ष इसुब मलनस, सचिव राजपाल भगत हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुभाष डाखोरे यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल मगर तसेच आभार प्रदर्शन नथू नगराळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक सुरेश गावंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. बळीराजा बचत गटाची सभा सुरु होण्याआधी नुकतेच कोरोना कालावधीत मयत झालेल्या बचत गटाचे सदस्य द्वारकाबाई लक्ष्मण गावंडे, किरण कन्नलवार गोकुळ व वाई बाजार येथील व्यापारी अशोक धोंडोपंत पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT