file photo
file photo 
नांदेड

Success Story- नांदेड : अर्ध्या एकरावरील संकरीत वांग्यानं लाखोंची कमाई, तब्बल एक किलोग्रॅमपर्यंत वांग्याचं वजन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनामुळे अनेकांचा हातचा व्यवसाय गेल्याने बरेच जण शेतीकडे व व्यवसायाकडे वळले. त्यातच लोहा तालुक्यातील बालाजी डांगेंना अर्ध्या एकरावरील संकरीत वांग्यानं लाखोंची कमाई करुन दिली आहे. नववर्षाच्या मुहुर्तावर त्यांच्या हाती लक्ष्मी आली आहे. इथल्या पोखरभोशी गावात डांगेंची शेती आहे. नोव्हेंबर महिन्यांत त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत वांग्याची निवड केली. अवघ्या अर्धा एकर क्षेत्रात त्यांनी संकरित आणि सुधारित काळ्या वांग्याच्या जातीची लागवड केली. सध्या ही वांगी तोडणीला आली आहे. हे पीक डांगेंना लाखोंच्या घरात उत्पन्न मिळवून देत आहेत. 

वांग्याच्या लागवडीसाठी मल्चिंगचा वापर

बालाजी डांगेंनी नोव्हेंबर महिन्यात जमीन भुसभुशीत करुन घेतली. मातीचे वाफे तयार केले. आणि त्यात बियांची लागवड केली. काही दिवसांतच रोपांनी जमिनीतून डोकं वर काढत आकाशाकडे पाहिलं. त्यानंतर बालाजी डांगेंनी गादीवाफे तयार केले. त्यावर मल्चिंग अंथरलं. आणि गादीवाफ्यावर या रोपांची योग्य अंतर सोडून लागवड केली.

ठिबकन पाणी वाचवल, पीकही जोमाने आले!

मल्चिंग अंथरल्यानंतर सगळ्या गादीवाफ्यांवर ठिबक सिंचन करण्यात आले. दुष्काळी भाग असल्याने शेतकऱ्यांना पाण्याचे संकट इथं नेहमीच भोगावं लागते. मात्र, ठिबक सिंचन केल्यामुळे अतिशय कमी पाण्यात वांग्याचे पीक जोमाने आले. शिवाय मल्चिंगमुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवनही थांबले आणि अवघ्या 2 महिन्यांत या झाडांना वांगी लगडली. प्रत्येक वांग्याचं सरासरी वजन 200 ते 500 ग्रॅमच्या दरम्यान आहे.

मेहनतीची वांगी फळाला आली!

एखादी नोकरी करावी अशा प्रकारे बालाजी डांगे शेतीकडे लक्ष देतात. सकाळपासून ते रात्रीपर्यंत ते शेतीतच असतात. सहा मजुरांसह खत, पाणी पिकाला देतात. किड-रोगांकडे त्यांचं बारीक लक्ष असते. त्यामुळं वांग्याचा दर्जा सुधारला आहे. परिणामी, वांग्याचं उत्पादन आणि वजनही जास्त भरत आहे.

नववर्षाच्या मुहुर्तावर वांग्यांतून लाखोंचा नफा

लागवडीनंतर अवघ्या 40 दिवसांत ही वांगी तोडणीला आली आहेत. वांग्याचा पहिला तोडाही झाला आहे. ज्यात त्यांना 1 टनापर्यंत वांग्याचं उत्पादन झाले आहे. अजून या पिकातून त्यांना 10 ते 11 टन वांग्याच्या उत्पादनाची अपेक्षा आहे. बाजारात वांग्याला 27 रुपये किलोचा दर मिळत आहे. ही सगळी वांगी बालाजी डांगे हैदराबादला पाठवत आहे. वांग्याचे वजन जास्त आहे, काही वांगी 1 किलो 200 ग्रॅमपर्यंत आहेत. त्यामुळे या पिकात त्यांना फायदाही जास्त होणार आहे. अजून 10 ते 11 टन उत्पादन अपेक्षित धरले, तर डांगेंना 40 ते 50 दिवसांत 3 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT