Sugarcane was burnt to ashes at Dongargaon in Loha taluka on Saturday.jpg 
नांदेड

डोंगरगाव येथील शेतात आग लागल्यामुळे ५० एकर ऊस जळून खाक

सकाळ वृत्तसेवा

लोहा (नांदेड) : लोहा तालुक्यातील डोंगरगाव येथे शनिवारी (ता.०६ ) दुपारी तीन वाजेच्या सुमारास ऊसास आग लागून अंदाजीत ४० ते ५० एकर ऊस जळून खाक झाला असल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती की, दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या लाईटच्या ताराचे घर्षन होऊन ऊसाच्या शेतात आगीचे गोळे पडून मोठ्या प्रमाणात आग लागली असल्याची चर्चा आहे. त्या आगीने वरचेवर रौद्र रूप धारण करून जवळपास ४० ते ५० एकर वर आग पसरून शेतातील उभा ऊस जळून खाक होऊन शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान होऊन होत्याचे नव्हते झाले. तसेच शेतात असलेल्या अनेक शेती उपयोगी वस्तू त्यात ठिबक, रबरी पाईप सह अन्य शेती उपयोगी साहित्य नष्ट झाल्याची माहिती समजली.

याबाबत लोहयाचे तहसिलदार विठठ्ल परळीकर यांच्याशी या घटनेची माहिती बाबत विचारणा करण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही, तहसीलदार विठ्ठल परळीकर हे लोहा तालुक्याच्या मुख्यालयी राहत नाहीत व कोणाचाही फोन उचलत नाहीत त्यामुळे त्यांच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.
 
त्यानंतर महसूल विभागाचे नायब तहसीलदार अशोक मोकले यांच्याशी सदर घटनेबाबत भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, डोंगरगाव येथे ऊस जळाला आहे. सदरील जळालेल्या ऊसाचे पंचनामे करण्याचे आदेश  तलाठी बोंडावार यांना दिले असल्याची माहिती नायब तहसीलदार अशोक मोकले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT