Crime News esakal
नांदेड

Nanded Crime : विषारी औषध प्राशन करून शेतमजूर दाम्पत्यानं उचललं टोकाचं पाऊल; पत्नीचा मृत्यू, पतीवर उपचार सुरू

मयत दाम्पत्यास आहेत तीन मुली, एकीचा झाला विवाह

सकाळ डिजिटल टीम

या प्रकरणी अर्धापूर पोलिस (Ardhapur Police) ठाण्यात गुन्हा नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्धापूर : शेतमजुरी (Nanded Ardhapur) आणि वाहन चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या वसरणी (ता. जि. नांदेड) येथील तरुण दाम्पत्यानं विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी दाभड शिवारात (ता. अर्धापूर) उघडकीस आली आहे.

या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पतीला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलिस (Ardhapur Police) ठाण्यात गुन्हा नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की वसरणी येथील कैलास बापुराव डोंगरे व त्यांची पत्नी ललिता कैलास डोंगरे हे वाहन चालवून उदरनिर्वाह करतात. ते शुक्रवारी (ता. चार) दुपारी घरातून बाहेर पडले होते. त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील दाभड शिवारात शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत पडलेले नागरिकांच्या निदर्शनास आले.

ही माहिती अर्धापूर पोलिस ठाण्याला कळविण्यात आली. ही माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, कल्याण पांडे, संजय घोरपडे, गोरकर घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेतली, तेव्हा ललिता कैलास डोंगरे यांचा मृत्यू झाला होता व कैलास डोंगरे हे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं.

तर, ललिता डोंगरे यांचे पार्थिव अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले. मयत दाम्पत्यास तीन मुली आहेत. एका मुलीचा विवाह झाला आहे. तर, या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे वसरणीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर- मनमाड महामार्गाच्या कामाला सुरुवात

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

Couvade Syndrome: चक्क पुरुषांनाही जाणवतात प्रेग्नन्सीसारखी लक्षणं? जाणून घ्या काय आहे ‘कूवाडे सिंड्रोम’

SCROLL FOR NEXT