Cement Road Sakal
नांदेड

Cement Road: डांबरीपेक्षा जास्त टिकतात, मात्र त्रासही तेवढाच देतात.. सिमेंटच्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त

Cement Road: डांबरी रस्त्यातून जमिनीत पावसाचे पाणी मुरते. पण, सिमेंट रस्त्यातून पाणी मुरत नाही. त्यामुळे जमिनीत पाणीपातळी देखील दिवसेंदिवस खोलवर जात आहे.

सकाळ वृ्त्तसेवा

Cement Road: वाढत्या तापमानामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. दुपारच्यावेळी तर घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. शहराच्या वाढत्या तापमानाला सिमेंट रस्तेही तेवढेच कारणीभूत ठरत आहेत. सिमेंट रस्ते उन्हामुळे गरम होतात आणि ते थंड होण्यास वेळ लागतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी देखील सिमेंट रस्त्यातून गरम वाफा बाहेर पडतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महापालिकेने गेल्या काही वर्षांत शहरात सिमेंट रस्त्यांचा सपाटा लावला. शासनाने दिलेला निधी, महापालिकेचा स्वनिधी, स्मार्ट सिटी तसेच आमदार, खासदारांच्या निधीतून शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून सर्रास सिमेंट रस्त्यांची कामे केली जात आहेत. नवे डांबरी रस्ते ही संकल्पनाच शहरातून संपत चालली आहे. गेल्या चार-पाच वर्षांचा विचार केला तर महापालिकेने दोनशे ते अडीचशे रस्ते क्रॉँक्रिटीकरणाच्या माध्यमातून केले आहेत. या रस्त्यांमुळे त्यामुळे शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

प्रत्येक वर्षी तापमानाची विक्रमी नोंद होत आहे. तापमान वाढीला शहरातील सिमेंट रस्तेदेखील कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेवढा जाड रस्ता, त्याप्रमाणात तापमान वाढते. सिमेंट रस्ते दिवसभर ऊन शोषून घेतात. त्यामुळे गरम होतात. गरम झालेले रस्ते रात्री उशिरापर्यंत थंड होत नाहीत. त्यामुळे ऊन संपल्यानंतरही अनेक तास सिमेंट रस्त्यांमधून उष्णता बाहेर पडत असते. अशीच अवस्था गट्टूची आहे.

सिमेंट रस्त्याचा बाजूला गट्टू बसविले जातात. सिमेंट रस्ते व गट्टूमधून उष्णता बाहेर पडते. याउलट डांबरी रस्ते लवकर थंड होतात; तसेच डांबरी रस्त्यांपेक्षा सिमेंट रस्ते तयार करताना २० टक्के निधी जास्त लागतो. डांबरी रस्त्यातून जमिनीत पावसाचे पाणी मुरते. पण, सिमेंट रस्त्यातून पाणी मुरत नाही. त्यामुळे जमिनीत पाणीपातळी देखील दिवसेंदिवस खोलवर जात आहे.

सिमेंट रस्ते दिवसभर उष्णता शोषून घेतात. ऊन कमी झाले तरी हे रस्ते लवकर थंड होत नाहीत. त्यामुळे वातावरणात अधिक काळ उष्णता कायम राहते. पण, शहरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला साइड ड्रेन नाहीत.

त्यामुळे डांबरी रस्ते लवकर खराब होतात. सिमेंट रस्त्यावर पावसाचा परिणाम होत नाही. त्यामुळे महापालिकेने सिमेंट रस्त्याला प्राधान्य दिले आहे. डांबरी रस्ता जास्तीत-जास्त पाच वर्षांपर्यंत टिकतो तर सिमेंट रस्त्याचे आयुष्य कितीतरी अधिक आहे.

- सखाराम पानझडे, निवृत्त शहर अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT