file Photo 
नांदेड

रविवारी नांदेडला ६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे

नांदेड - शहरात दोन कोरोना चाचणी लॅब असून देखील स्वॅब टेस्टींग मदावली होती. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढल्याने स्वॅब टेस्टींगला गती आली आहे. रविवार (ता. २१) कोरोना अहवालानुसार एक हजार ३०६ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार २४१ निगेटिव्ह, ६० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.याचबरोबर उपचार घेत असलेल्या ३६ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या २३ हजार १४९ एवढी झाली आहे. यातील २२ हजार चार बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. सध्या ३४२ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून, यातील १४ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आत्तापर्यंत जिल्हाभरात ५९२ व्यक्तींची उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

अशी आहे जिल्हा निहाय संख्या

रविवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये विष्णुपुरी शासकीय एक, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १६, किनवट आठ, जिल्हा शासकीय रुग्णालय तीन, लोहा एक, खाजगी रुग्णालय सात असे ३६ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. रविवारी बाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्र ४६, नांदेड ग्रामीण एक, धर्माबाद एक, किनवट १३, मुदखेड एक, हदगाव चार, माहूर एक, हिंगोली एक, परभणी एक, आदिलाबाद एक, हिमायतनगर एक, देगलूर एक, उमरी एक असे ६० बाधित आढळले. 

गृहविलगीकरणात सर्वाधिक रुग्ण

जिल्ह्यात ३४२ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात २९, जिल्हा रुग्णालय ३८, किनवट सहा, हदगाव सात, देगलूर चार, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण १७४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ४५, खाजगी रुग्णालय ३९ आहेत. 

कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - २३ हजार १४९ 
एकूण कोरोनामुक्त रुग्ण - २२ हजार चार 
एकुण मृत्यू संख्या- ५९२ 
रविवारी पॉझिटिव्ह - ६० 
रविवारी कोरोनामुक्त - ३६ 
रविवारी मृत्यू - शुन्य 
रविवारी प्रलंबित स्वॅब - ३९६ 
उपचार सुरु - ३४२ 
अतिगंभीर रुग्ण - १४ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT