Bike Robbery sakal
नांदेड

Bike Robbery : वाहनचोर टोळीला बेड्या ; किनवटमध्ये सहा जणांकडून ६१ दुचाकी जप्त

शहरासह जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली आहे. त्यात सहा जणांचा समावेश असून, त्यांनी केलेले ५१ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरासह जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली आहे. त्यात सहा जणांचा समावेश असून, त्यांनी केलेले ५१ गुन्हे उघडकीस आले आहेत. २१ लाख ४७ हजार रुपयांच्या ६१ दुचाकींसह अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या आदेशानुसार दुचाकीचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांनी पथके स्थापन केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पथकातील फौजदार आनंद बिचेवार आणि सचिन सोनवणे यांनी किनवट येथे जाऊन बालाजी अभिमान माने (वय २७), दीपक सुरेश कोकुर्ले (२३), विकास शेषेराव शिंदे (२३), रमेश श्यामराव कयापाक (३८), राजू दादाराव भगत (२४) आणि शफी फकरोद्दीन सय्यद (२३, रा. सर्व किनवट) या संशयितांना अटक केली.

त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ६१ दुचाकी जप्त करण्यात आल्या. कारवाईतून दुचाकीचोरीचे ५१ गुन्हे उघड झाले आहेत. उर्वरित दहा गुन्ह्यांबाबत शहानिशा करून संबंधित पोलीस ठाण्यास माहिती देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT