लसीकरण केंद्र 
नांदेड

नांदेडमध्ये आज 45 वर्षांवरील लाभार्थ्यांनाच कोविडशिल्डचा दुसरा डोस

प्रत्येक संस्थेसाठी 100 डोसेसची झाली उपलब्धता. लसीकरण कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील 45 वय वर्षांवरील नागरिकांसाठी (Nnaded 45 yr old citizens) कोविडशिल्डचा प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोसेस आज गुरुवार (ता. 13) मे रोजीच्या लसीकरणासाठी उपलब्ध झाले आहेत. हे कोविडशिल्डचे डोसेस (Covishild) ज्यांनी पहिल्यांदा घेतले आहेत व जे दुसऱ्या डोससाठी वाट पाहत आहेत अशा प्रत्येकी 100 व्यक्तींना (100 people) प्रत्येक केंद्रनिहाय देण्याचे नियोजन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे.

(The second dose of Covidshield is only for beneficiaries above 45 years of age in Nanded today)

लसीकरण केंद्रावर 18 ते 45 वयोगटातील युवक- नागरिकांनी गर्दी न करता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा - रमजान ईदमुळे दुधाच्या भावाने उसळी

नांदेड शहरात पुढीलप्रमाणे लसीकरण केंद्र आहेत. यात श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा असे एकूण 7 केंद्र आहेत. शहरी हद्दीत सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असे एकूण 16 केंद्र आहेत.

ग्रामीण हद्दीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु असून एकूण 67 केंद्र आहेत. या प्रत्येक केंद्रावर आजच्यासाठी कोविडशिल्ड या लसीचे 100 डोस उपलब्ध मिळाले आहेत. लसीकरणाच्या या मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे. नांदेड जिल्ह्यात 11 मे पर्यंत एकुण 3 लाख 78 हजार 166 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

Gold Price: अमेरिकेतलं १२९ टन सोनं माघारी आणलंच नाही..! एका निर्णयाने फ्रान्सची सेंट्रल बँक तोट्यातून थेट नफ्यात

Latest Marathi News Live Update: मीरा-भाईंदर परिसरातील कचरा आणि मातीचं मिश्रण मुंबईत टाकल्याचा प्रकार

IPL 2026 New Rule: आयपीएलने खेळाडूंसाठी आणला नवा नियम! ज्याचं नाव, त्यालाच परवानगी... नव्या नियमाने फ्रँचायझींमध्ये गोंधळ

Kirit Somaiya journalists clash : किरीट सोमय्यांची पत्रकारांना थेट दमदाटी, प्रश्न विचारताच भडकले; मुंबईतील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT