File photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात जबरी चोरीच्या घटनांमध्ये होतेय वाढ, पोलिसांसमोर मोठे आव्हान  

प्रमोद चौधरी

नांदेड : भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून शुक्रवारी (ता.२५) दोन जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चोरांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केल्याचे या वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे. 

शुक्रवारी मथुराबाई मारोतीराव वानखेडे (वय ६५, रा. विवेकनगर) या वीज बिल भरण्यासाठी गेल्या होत्या. बिल भरून श्रीनगर येथे आल्या असता, दोन आरोपींनी त्यांना कोठे राहता, असे विचारून अॅन्टी करप्नशन एसपी आॅफीसच्या बोळीमध्ये नेले. तेथे त्यांच्याजवळी पैसे, हातातील कडे, पाटल्या तसेच कानातील सोन्याचे काड्या आणि गळ्यातील सोन्याची पोत काढून पळून गेले. मथुराबाई वानखेडे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. शेख पुढील तपास करत आहेत. 

दुसरी घटना माणिकनगर येथील डॉ. पाटील हॉस्पीटलच्या समोर घडली. रसीका रामराव कांबळे (रा. सप्तगिरी कॉलनी) या मुलीची तब्येत ठीक नसल्याने डॉ. पाटील हॉस्पीटलमध्ये स्कुटीवरून (क्र एमएच-२६, एसी ७९३७) जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या आरोपींनी त्यांच्या गळ्यातील शॉर्ट गंठन (किंमत ४५ हजार रुपये) जबरीने हिसकावून पळून गेले. रसिका कांबळे यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. बोनवाड तपास करत आहेत. 

हे देखील वाचाच - नांदेड - वाघाळा महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू पण...
  
दुचाकी चोरीचे प्रमाणतही वाढ
नांदेड ः
शहर व जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, दररोज तीन ते पाच दुचाकी चोरीचे गुन्हा विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होत आहेत. शनिवारी (ता.२६) विविध पोलिस ठाण्यांमध्ये तीन दुचाकी चोरीचे गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. देवानंद प्रकाशराव कारामुंगे (रा. नवघर वाडी) यांची दुचाकी (एमएच२२, एक्यु-४३४८) प्रियदर्शननीनगर कंधार येथून चोरीला गेली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कंधार पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

तसेच शंकरसिंग बिकमसिंग सिंधू (रा. चंदासिंग कॉर्नर दशमेस सॉमील) यांची हिरो होंडा पॅशन प्रो कंपनीची दुचाकी (क्र. एमएच-२६, वाय-६७७०) चंदासिंग कॉर्नर येथून चोरीला गेली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. तिसरा गुन्हा भाग्यनगर पोलिस ठाण्यामध्ये नोंदविण्यात आला आहे. विजय प्रकाशराव कदम (रा. साईबाबा नगर छत्रपती चौक) यांची डिलक्स कंपनीची दुचाकी (क्र. एमएच-२६, एसी-३३२८) घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT