File photo 
नांदेड

नांदेड : गड्‌या बरी आपुली चटणी भाकर, फुकटापेक्षा मेहनती बरी 

प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र घरबसल्या ऑनलाइन कामाला प्राधान्य दिले जात असून त्यामुळे हळूहळू लोकं सुद्धा डिजिटली साक्षर होत आहेत. या काळात लोक घराबाहेर निघत नसल्याने चोर सुद्धा ओव्हर स्मार्ट झाले आहेत. घरबसल्या तुमच्या मोबाईलवर लाखोंचे बक्षीस लागल्याचे संदेश सातत्याने आदळत असून लाखोंच्या ऑफर घरबसल्या दिल्या जात आहे. मात्र खेड्यातील नागरिक सुद्धा माध्यममुळे सतर्क झाले असून लाखोंच्या ऑफर पेक्षा आपली चटणी भाकर बरी असल्याचे म्हणत आहेत. 

इंटरनेटच्या महाजालात विविध कंपन्या ग्राहकांना भरमसाठ आमिषे देवून आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे तुम्ही ज्या जाहिराती फेसबूक, युट्यूब व इतर माध्यमांवर शोधत असतात, त्याच तुमच्या मानसिकतेचा अभ्यास करून तुमच्या खात्यावर त्याच पद्धतीच्या जाहिराती व लिंक्‍स पाठविल्या जातात. वाहन व विविध मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांकडे आपले नंबर कोठून येतात याचा कधी विचार केला का? नाही ना. कधी काळी एखादे सीम घेताना, कुठल्या मॉलमध्ये एखादी वस्तू खरेदी केल्यावर दुकानदार तुमचे केवळ नाव व नंबर नमूद करतात. मग सुरू होतात संदेशाचा भडिमार. तुम्ही दिलेले हेच नंबर सर्वत्र वायरल होतात. 

हेही वाचा - नांदेड- १९ हजार पैकी ९७ टक्के रुग्णांची कोरोनावर मात, रविवारी ५५ जण पॉझिटिव्ह, ४५ जण कोरोनामुक्त
 
काळानुरूप बदलली चोरीची पद्धत 
समाज माध्यमाद्वारा एखादी वस्तू खरेदी किंवा विक्री करायची असे सांगून व्यवहाराला सुरुवात होते. खात्यात पैसे टाकण्या संदर्भात थोडे पैसे आता टाकतो, असे सांगून विश्वास संपादन करून नंतर तुमच्या खात्यावर डिजीटली डल्ला मारतात. आपण ग्रामीण भागातील युवक असाल तर पंतप्रधान बेरोजगार भत्ता, मोबाईल रिचार्ज सवलत, शेतकरी कर्जमाफी शिवाय तुमच्या मोबाईल क्रमांकाला ५१ लाख, २१ लाख सारखे बक्षीस लागल्याचे संदेश पाठविल्या जातात. 

हे देखील वाचाच - केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी हिताच्या बदलांची राज्याने अंमलबजावणी करावी
 
फुकटापेक्षा मेहनत बरी 
फुकट मिळत असलेल्या आमिषाला बळी पडण्याचे प्रमाण वाढले असून दर दिवशी शहर व गावं खेड्यात नागरिक बळी पडत आहेत. त्या संदर्भात पोलिसांत गुन्हे सुद्धा दाखल होत आहेत. प्रसार माध्यमांमध्ये दरदिवशी येणाऱ्या बातम्या बघून आता ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा बऱ्यापैकी सतर्क झाले असून तुमच्या फुकटच्या लाखो रुपयांपेक्षा आमची मेहनतीची चटणी भाकर बरी, असा त्यांचा सूर आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उड्डाण घेतलं अन् थेट जमिनीवर कोसळलं; हेलिकॉप्टरचा अपघात; सहा जणांचा मृत्यू, कुठं घडली घटना?

Rajnath Singh Statement: धाकड' CM आता बनले 'धुरंधर'! २०२७ मध्ये लगावणार विजयाचा 'सिक्सर'; राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

SCROLL FOR NEXT