जबरी चोरीच्या घटना 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ : एका घटनेत पिस्तुलचा तर दुसऱ्या घटनेत चाकुचा धाक दाखवून २३ लाख लुटले

नवा मोंढा येथील योगेश मार्केटींग दुकानाचे मालक ओम बोरलेपवार हे बॅगमध्ये १४ लाख ८० हजार रुपयाची रक्कम घेवून बॅंकेत भरण्यासाठी मगनपूरा येथून चिखलवाडी काॅर्नरकडे जात होते.

प्रल्हाद कांबळे

नांदेड ः जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona virus) पोलिस बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याचे पाहून सोमवारी (ता. दहा) जबरी चोरीच्या दोन घटना घडल्या. यामुळे पोलिस यंत्रणा चांगलीच खडबडून जागी झाली आहे. नांदेड शहरात हिंगोली गेट उड्डाण पुलावर दुपारी एक वाजताच्या सुमारास एका व्यापाऱ्यास पिस्तुल दाखवून (robbery) १४ लाख ८० हजार तर दुसऱ्या घटनेत वडेपूरी (ता. लोहा) शिवारात पेट्रोलपंप व्यवस्थापकाच्या डोळ्यात तिखट टाकून आणि चाकु मारुन आठ लाखाची बॅग लंपास केली. याप्रकरणी वजिराबाद व सोनखेड पोलिस (sonkhed and wazurabad police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thieves rampant in Nanded district: 23 lakh looted at gunpoint in one case

नवा मोंढा येथील योगेश मार्केटींग दुकानाचे मालक ओम बोरलेपवार हे बॅगमध्ये १४ लाख ८० हजार रुपयाची रक्कम घेवून बॅंकेत भरण्यासाठी मगनपूरा येथून चिखलवाडी काॅर्नरकडे जात होते. त्यांची दुचाकी हिंगोली गेट उड्डाण पुलावर आली असता, त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुसऱ्या एका दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी श्री. बोरलेपवार यांची दुचाकी अडविली. सर्वप्रथम दुचाकीवरील एखा चोरट्यांने बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्याने त्यांना धाक दिला. या दोघांनाही बोरलेपवार यांनी बॅग देण्यास नकार दिला. यावेळी तिसऱ्या आरोपींनी आपल्या जवळचा पिस्तुल काढून त्यांच्या कानशिळावर लावली. यानंतर श्री. बोरलेपवार यांच्याकडील १४ लाख ८० हजार रुपये ठेवलेली बॅग चोरट्यांनी हिसकावली. ही बॅग हातोहात लंपास करुन चोरट्यांनी पोबारा केला.

हेही वाचा - Good News : खासदार तथा गुजरात प्रभारी अॅड. राजीव सातव यांची कोरोनावर मात; चाहत्यांमधून आनंदाचे वातावरण

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, वजिराबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, संजय केंद्रे, श्री. येळगे व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलिसांनी नवा मोंढा येथील दुकानातील सीसीटिव्ही फुटेजचीही तपासणी केली. परंतु, माहिती मिळू शकली नाही.

पेट्रोलपंप चालकास लुटले, आठ लाखाची बॅग लंपास

तर दुसऱ्या घटनेत नांदेड लोहा रस्त्यावर असलेल्या वडेपूरी येथील शहीद पेट्रोलपंपचे व्यवस्थापक नागनाथ शंकरराव केंद्रे हे आपल्या पेट्रोलपंपहून आठ लाख रुपये घेऊन नांदेडकडे येत होते. दुपारी बारा वाजता त्यांची दुचाकी वडेपुरीपासून काही अंतरावर पुढे येताच त्यांच्या डोळ्यात पाठीमागून येणाऱ्या चोरट्यांनी तीखट टाकले. एवढेच नाही तर त्यांच्यावर चाकुहल्ला करुन त्यांच्याजवळ असलेली आठ लाख रुपयाची बॅग लंपास केली. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी घटनास्थळाची पाहणी करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT