नांदेड - लॉकडाउनच्या दहा महिण्यानंतर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंच्या शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक चाचणी करण्यासाठी येत असल्याने त्यांच्यातील अनेक शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे काही दिवसापूर्वी कोरोना आजारी रुग्णांची रोडावलेली संख्या पुन्हा वाढीस लागली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
रविवारी (ता.३१) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी सोमवारी (ता. एक) केवळ ४०३ स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामधील ३७३ निगेटिव्ह, २६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ हजार ५६३ इतकी झाली आहे. दुसऱ्या दिवशी सोमवारी एकाही बाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ५८६ वर स्थिर आहे.
२१ हजार ४५० पॉझिटिव्ह रुग्ण बरे
सोमवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - एक, जिल्हा शासकीय रुग्णालय - एक, मनपाअंतर्गत गृहविलगीकरण कक्षातील - १५, गोकुंदा - एक, देगलूर - दोन, बिलोली - तीन व खासगी रुग्णालयातील पाच असे २८ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत २१ हजार ४५० पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नांदेड महापालिका क्षेत्रांतर्गत - १४, नांदेड ग्रामीण - दोन, भोकर - एक, कंधार - एक, उमरखेड - एक, हदगाव - एक, नायगाव - एक, मुखेड - चार आणि हिंगोली एक असे २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. सध्या जिल्हाभरात ३२३ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामधील १२ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ३९६ स्वॅब अहवालांची तपासणी सुरु होती.
नांदेड कोरोना मीटर
एकूण कोरोना बाधित रुग्ण - २२ हजार ५६३
एकूण कोरोनामुक्त रुग्ण - २१ हजार ४५०
एकूण मृत्यू - ५८६
सोमवारी पॉझिटिव्ह रुग्ण -२६
सोमवारी कोरोनामुक्त रुग्ण- २८
सोमवारी मृत्यू - शुन्य
उपचार सुरु - ३२३
गंभीर रुग्ण - १२
स्वॅब तपासणी सुरु - ३९६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.