शेतकरी माधव शिंदे 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

उमरी/ मारतळा (जि.नांदेड) : नापिकी, कर्जफेडीच्या विवंचनेतून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात (Farmers Suicide In Nanded) घडल्या. धनंज (बुद्रुक, ता. लोहा) येथील माधव गोविंदराव शिंदे (वय ३२) या शेतकऱ्याने विहीरीवर पाणी शेंदण्याच्या चरकाला गुरुवारी (ता.पाच) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या (Nanded) केली. त्यांची सात एकर कोरडवाहू शेती असून बॅंकेचे कर्ज होते. नापिकी, अतिवृष्टीमुळे शेतीचे (Farmer) नुकसान झाल्याने कर्जफेडीच्या विवंचनेत ते होते, असे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या मागे आई, पत्नी, लहान दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. उस्माननगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.

नापिकी, कर्जाच्या विवंचनेतून भायेगाव (ता. उमरी, जि. नांदेड) येथील शेतकरी माधव चांदू वाघमारे (३५) यांनी बुधवारी (ता. चार) सकाळी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. उमरी पोलिसांनी पंचनामा केला. वाघमारे यांच्या मागे आई, दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या करुणाताई खंडेलोटे यांनी तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट

Team India New Coach: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम बदलली, आता कोचही बदलणार, गौतम गंभीरचा पत्ता कट ? नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Teachers Protest: महाराष्ट्रातील शिक्षक आक्रमक! ९ जुलैला शाळा बंद ठेवणार; आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन, कारण काय?

लग्नानंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार रिचा-अली; सोशल मीडियावर पोस्ट करत केली नव्या चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT