file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात दोन वेगवेगळया घटनामंध्ये दोघांचा मृत्यू झाला. यात एका घटनेत कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या तर दुसऱ्या घटनेत विज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू. या दोन्ही घटना रविवारी (ता. १४) सायंकाळच्या सुमारास घडल्या. या प्रकरणी किनवट व हिमायतनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, किनवट तालुक्यातील मलकवाडी येथील शेतकरी लक्ष्मण हुलाजी गेडाम (वय ४०) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. तरीसुध्दा हिंम्मत न हारता ते दरवर्षी आपल्या शेतात पेरणी करत. मात्र सतत लहरी निसर्गाचा फटका त्यांना बसत आला. कधी अवर्षण तर कधी ओला दुष्काळ यामुळे ते खचुन गेले. घरगाडा चालविण्यासाठी त्यांनी कर्ज काढले. 

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

मात्र शेतातील उत्पन्न घटल्याने कर्जाची परतफेड वेळेत करु शकत नव्हते. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा या दुहेरी संकटात सापडलेल्या लक्ष्मण गेडाम यांनी अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शेवटी रविवारी (ता. १४) सकाळी आठ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती चंदु उत्तमराव गायकवाड यांच्या माहितीवरुन किनवट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक संदुपटलेवार करत आहेत.

येथे क्लिक करा स्वराज्य संस्थापिका : राष्ट्रमाता जिजाऊ
 

हिमायतनगर पोलिस ठाण्यात नोंद

तर दुसऱ्या घटनेत शेतात काम करणाऱ्या सुभाष दिगंबर तुंडेकर (वय ४२) यांच्या अंगावर रविवारी (ता. १४) विज पडून त्यांचा मृत्यू झाला. ते सरसम बु. (ता. हिमायतनगर) शिवारात ते शेतात मशागत करु लागले. रविवारी अचानक सायंकाळच्या सुमारास ढग भरुन आले आणि विजाच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. बचावासाठी सुभाष तुंडेकर यांनी शेतातील बाभळीच्या झाडाचा आधार घेतला. मात्र त्याच्या अंगावर विज पडून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विजयकुमार देशमुख यांच्या माहितीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री. ठाकरे करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

मोठी बातमी! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती; रिक्त पदे अपलोड करायला १० जुलैपर्यंत मुदत

उजनीत ८१ हजार क्युसेकची आवक! पुण्यातील पश्चिम घाटमाथ्यावर दमदार पाऊस, 3 दिवसांत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता; गतवर्षी धरण 27 मे रोजी प्लसमध्ये, वाचा....

Daliya Laddu Recipe:फायबरने भरपूर अन् पचायला हलके , १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक दलियाचे लाडू

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

SCROLL FOR NEXT