नांदेड - गेल्या दोन चार दिवसांपासून कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या परत वाढत चालली असून शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर दोन जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ४७ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. शुक्रवारी सायंकाळी ८९१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८४२ निगेटिव्ह आले तर ४३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २० हजार ७७१ झाली आहे. दरम्यान, उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात कलामंदिर, नांदेड, महिला (वय ७०) आणि सुमेध नगर, नांदेड पुरूष (वय ६५) यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची संख्या ५५६ झाली आहे.
१४ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर
रुग्णालयात दाखल असलेल्या ४७ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे सुटी देण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या रुग्णांची संख्या १९ हजार ६९९ झाली आहे. सध्या रुग्णालयात ३२१ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी १४ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे सध्याचे प्रमाण ९४.८३ टक्के आहे. शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजेपर्यंत विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात १७० तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे ६२ खाटा शिल्लक असल्याची माहितीही देण्यात आली.
३२१ रुग्णांवर उपचार सुरू
शुक्रवारी ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये नांदेड महापालिका क्षेत्र ३०, नांदेड ग्रामिण - दोन, भोकर - दोन, कंधार - दोन, नायगाव - एक, बिलोली - एक, मुखेड - एक, हदगाव - एक, परभणी - एक, यवतमाळ - एक आणि तेलंगणातील एकाचा समावेश आहे. सध्या ३२१ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात २५, जिल्हा रुग्णालयात - २४, जिल्हा रुग्णालय नवीन इमारतीत - ३२, मुखेड कोविड रुग्णालयात १८, देगलूरला एक, भोकरला दोन, हदगावला सहा, किनवटला एक, नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरणात ४२, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात ४२ तर खासगी रुग्णालयात १५ रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचलेच पाहिजे - अत्याचार व खून प्रकरण : आक्रोश मोर्चामुळे बिलोली शहर कडकडीत बंद, तीन तास रास्ता रोको
नांदेड कोरोना मीटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.