crime nanded  sakal
नांदेड

महिला प्रवाशावर अत्याचार; दोघे जण अटकेत

धर्माबाद रेल्वेस्थानकावरील घटना, दागिने व रोख रक्कमही लुटली

सकाळ वृत्तसेवा

धर्माबाद : भावासोबत पैसे काढण्‍यासाठी धर्माबाद रेल्वे स्‍थानकावर आलेल्या विवाहित महिलेवर पाचवेळा अत्याचार करून तिच्‍या गळ्यातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे ७५ हजार ५०० रुपयांचा ऐवज हिसकावला. या प्रकरणी नांदेड लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली.अक्षय धोंडिबा क्षीरसागर (वय २४, रा. व्यंकटेशनगर, उमरी, जि. नांदेड) आणि भीमराव बाबूराव सरजे (वय ३२, रा. इळेगाव ता. धर्माबाद) अशी संशयितांची नावे आहेत. दोघांना २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्यायालयाने शनिवारी (ता. २२) दिले. या प्रकरणात एका ३० वर्षीय विवाहितेने तक्रार दिली.

त्यानुसार, गुरुवारी (ता. २०) ती भावासोबत पैसे काढण्‍यासाठी नांदेड येथून मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेसने धर्माबादला आली. धर्माबादला रात्रीच्या वेळी गाडी थांबताच दोघे भाऊ-बहीण खाली उतरत असताना तेथे अचानक एक व्‍यक्ती आली. तिने रेल्वेचा अधिकारी आहे, असे म्हणून फिर्यादीला खाली खेचले. त्‍याच वेळी त्‍या व्‍यक्तीचा साथीदारही तेथे आला. त्‍यांनी फिर्यादीच्‍या भावाला मारहाण केली. फिर्यादीच्‍या भावाच्‍या हातात रॉड टाकलेला असल्याने त्‍याने तेथून प्रतिकार करत पळ काढला. त्यानंतर दोघा आरोपींनी फिर्यादी महिलेला खांद्यावर उचलून घेत प्‍लॅटफार्म खाली असलेल्‍या मोकळ्या जागेत मारहाण करून तिच्‍या तोंडात कॅरिबॅग कोंबून तब्बल पाच वेळा अत्याचार केला.

तसेच अंगावरील दागिने तसेच मोबाइल, पर्समधील पैशांसह सर्व सामान हिसकावून घेतले. फिर्यादी समोरच त्‍याच्‍या वाटण्‍या केल्या. शुक्रवारी पहाटे चारच्‍या सुमारास रेल्वेच्‍या उजेडामुळे संधी मिळताच फिर्यादीने पळत-पळत सुरू झालेली रेल्वे गाठली. मात्र, संशयित आरोपी अक्षय क्षीरसागर तिच्‍या पाठोपाठ पळत आला व फिर्यादीचा हात ओढत असताना घाबरलेल्या फिर्यादीने आरडा-ओरडा केला. त्यानंतर रेल्वेतील इतर नागरिकांनी फिर्यादीसह आरोपीला रेल्वेत ओढले. उमरी येथे दोघांना पोलिसांच्‍या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणात नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला. लोहमार्ग पोलिसांनी तपास करून संशयित अक्षय क्षीरसागर याला शुक्रवारी तर भीमराव सरजे याला शनिवारी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

Pune Water Crisis: पाण्याचा प्रत्येक थेंब महागला! अर्धा किलोमीटर पायपीट करून विहिरीवर गेलेल्या महिलेचे दोन्ही पाय फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update : खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

SCROLL FOR NEXT