file photo 
नांदेड

उमरी : कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे विचार आत्मसात करण्याची गरज- प्रणिता शरद जोशी 

प्रल्हाद हिवराळे

उमरी (जिल्हा नांदेड) : अंधश्रध्देवर विश्वास ठेऊ नका, समाजात भेदभाव करु नका, मुलगा वंशाचा दिवा समजून मुलींची हत्या करु नका, मुलगीही वंशाचा दिवा असू शकते, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, देवळातला देव शोधण्याऐवजी माणसात देव शोधावा, भुकेल्याना अन्नदान करा तसेच आपले गाव व शहर परिसर सुंदर स्वच्छ ठेवल्यास गावात व शहरात लक्ष्मी नांदते असे गाडगेबाबा सांगुन गेले. त्यांच्या विचारावर समाजातील प्रत्येक घटकांनी चालावे असे आवाहन भाजपाच्या महिला मोर्च्याच्या तालुकाध्यक्षा प्रणिता शरद जोशी यांनी केले. 

कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा महिला सरचिटणीस प्रेमलताताई आग्रवाल, तर प्रमुख पाहुणे शुभांगी पाळेकर, प्राचार्य पुरुषोत्तम गाटे, ओबीसी तालुकाध्यक्षा सुनिता पोपटेलवार आदीसह मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.

स्वत: च्या हातात झाडू घेऊन जनमनात स्वच्छतेचा मंञ देत परिसरासोबत मनाची स्वच्छता कशी करता येईल, अंधश्रद्धा मुक्त, सुशिक्षित समाज कसा घडविता येईल इत्यादी संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेचा मंञ जिल्हा चिटणीस शुभांगी पाळेकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितला. यावेळी नंदाबाई खंदारे, मीरा सोनकाबंळे, शहनाज बेग, निताबाई शेळके, बालाजी खंदारे, नागोराव गायकवाड, अविनाश बनसोडे,  संतोष पोपटेलवार आणि विजय नलबलवार आदींची उपस्थिती होती.
 

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये हनुमान जयंती निमित्ताने 51 फूट उंच मारुती च्या दर्शनाला गर्दी

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT