file photo
file photo 
नांदेड

उत्तर प्रदेशच्या कामगाराचा नांदेडात शॉक लागल्याने मृत्यू

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव येथे कामासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील एका युवकास विद्युत शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना ता. २१ नोव्हेंबरच्या सायंकाळी सातच्या सुमारास कारखाण्यावर घडली. या प्रकरणाची नोंद बारड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशमधील ब्रहानपूर जिल्ह्यातील अकबरपुर तालुक्यात ग्रामपटहेड खजुरी येथील अदनान खान अल्ताफ खान (वय २०) हा आपल्या इतर सहकार्‍यांसह भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव, तालुका अर्धापूर येथे कामासाठी आला होता. ता. २१ नोव्हेंबर च्या सायंकाळच्या सुमारास तो आपल्या इतर साथीदारांसह कारखान्यावर वेल्डिंगचे काम करत असताना त्याला जोराचा विद्युत शॉक लागला. व यात तो गंभीर भाजला गेला. कारखाना प्रशासन व सहकाऱ्यांनी तात्काळ त्याला नांदेडच्या शिवाजीनगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र विद्युत शॉक जबर लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती अजीम रहमान लतीफ रहमान या त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यानंतर बारड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री कारंजकर करत आहेत.

विवाहितेचा छळ 

नांदेड शहराच्या विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सावित्रीबाई फुलेनगर येथील एका विवाहितेस माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी २०१२ पासून ता. एक जानेवारी २०१३ पर्यंत सतत सुरु असल्याने या छळाला कंटाळून अखेर या पीडित विवाहितेने विमानतळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सासरच्या मंडळीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस फौजदार श्री वाघमारे करत आहेत.

जनावर चोरी 

मनाठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ता. २६ नोव्हेंबर ते ता. २७ नोव्हेंबरच्या दरम्यान शिबदरा शिवारातील एका आखाड्यावर बांधलेले दोन बैल बांधून अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. ता. २७ नोव्ंहेबरच्या सकाळी ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी काशिनाथ यांच्या फिर्यादीवरून मनाठा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. पवार करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT