Department of Agriculture  sakal
नांदेड

नांदेड : रिक्त पदांमुळे कृषी विभाग सलाईनवर

जिल्ह्यात टीएओंच्या १६ पैकी नऊ पदे रिक्त : २१ एओ पद रिकामे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : साडेपाच लाख खातेदार शेतकऱ्यांचा कारभार हाती असलेल्या कृषी विभागातील १६ पैकी तब्बल नऊ पदे रिक्त असल्याने या ठिकाणचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर आहे. या सोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालकांसह जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील तब्बल ३१७ पदे रिक्त आहेत. मराठवाड्यातील सर्वाधिक साडेआठ लाख पेरणीक्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्याचा कृषी विभाग सध्या रिक्त पदांमुळे सलाईनवर आला आहे.

निम्यापेक्षा अधिक तालुक्यांचा कारभार प्रभारीवर असल्याने या कामाचा ताण प्रभारींना असह्य होत आहे. जिल्ह्यातील एकूण १६ पैकी नऊ तालुका कृषी अधिकाऱ्याची पदे रिक्त आहेत. परिणामी, या तालुक्यातील शेतकऱ्यांना योजनांचा लाभ व इतर कामांसाठी कृषी कार्यालयाचे खेटे घालावे लागत आहेत. कृषी विभागाकडे यापूर्वीच दीडशेपेक्षा अधिक योजनांचा भार आहे. अशातच शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या कामाचा भारही त्यांना सहन करावा लागतो. अशातच पीएम किसान सन्मान योजनेचे कामही कृषी विभागाच्या खांद्यावर आल्याने प्रभारी अधिकाऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे.

टिएओची रिक्त पद असलेले तालुके (कंसात प्रभारी टिएओ)

बिलोली (सरेंद्र पवार), नायगाव (दिगंबर गोसावी), मुखेड (विशाल बिराडे), देगलूर (सोमेश्‍वर गिरी), कंधार (विकास नारनाळीकर), मुदखेड (सुभाष वाघमारे), उमरी (दिलीप जाधव), माहूर (बालाजी मुंडे), किनवट (बालाजी मुंडे). तर टिएओ कार्यरत असलेल्या तालुक्यात नांदेड : सिद्धेश्‍वर मोळके, भोकर : विठ्ठल गिते, अर्धापूर : अनिल शिरफुले, लोहा : अरुण घुमनवाड, धर्माबाद : सुरेंद्र पवार, हदगाव : श्री. रणवीर, हिमायतनगर : विजय चन्ना

रिक्त पदांचा तपशील

जिल्ह्यात वर्ग एक अधिकारी मजूर वर्गापर्यंत ९६१ पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या ६४४ पदे भरलेली आहेत. तर तब्बल ३१७ पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली. यात सोळा तालुका कृषी अधिकाऱ्यांपेकी नऊ पदे रिक्त आहेत. यासोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालकांसह नऊ पदे, ११ कृषी अधिकारी, १० मंडळ कृषी अधिकारी, ६२ अनुरेखक, २४ कृषी पर्यवेक्षक, ७० कृषी सहायक, सहा सहायक अधीक्षक, सहा वरिष्ठ लिपीक, ११ कनिष्ठ लिपीक, १६ वाहन चालक, ५९ शिपाई, १५ रोपमळा मदतनीस, एक नाईक, तीन ग्रेड-एक मजूर, एक स्वच्छक असे एकूण मंजूर ९६१ पदांपेकी ३१७ पदे रिक्त असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

जिल्ह्यातील कार्यरत तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या झाल्याने नऊ तालुक्यांचा कारभार प्रभारीवर आहे. कृषी विभागाकडील कामाचा व्याप लक्षात घेता या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्यास कामाला गती येईल.

- रवीशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT