Nanded Photo 
नांदेड

Video : या आयुर्वेदिक औषधाने कमी होऊ शकतो कोरोनाचा प्रादुर्भाव

शिवचरण वावळे

नांदेड : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आर्सेनिक - ३० नावाने असलेल्या होमिओपॅथिक पद्धतीने तयार केलेल्या गोळ्या घेण्यास परवानगी दिली. भारतात तयार झालेल्या या गोळ्यांना भारतातच नव्हे तर इतर देशाने सुद्धा मोठी मागणी केली होती. मात्र, आयुर्वेदिक उपचार पद्धतीने तयार केल्या गेलेल्या औषधींचा फारसा कुठे गवगवा झाला नसल्याचे दिसून आले. नांदेडचे आयुर्वेदिक डॉ. विश्वंभर पवार निवघेकर यांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी तीन प्रकारची आयुर्वेदिक औषधी तयार केली आहे. 

या औषधींचा देखील काही प्रमाणात कोरोनाचे विषाणू रोखण्यासाठी व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग होईल, अशी शक्यता डॉ. पवार यांनी व्यक्त केली आहे. डॉ. पवार म्हणाले की, कोरोनाचे विषाणू नाक, तोंड आणि डोळ्यावाटे मानवाच्या शरीत प्रवेश करतो आणि काही दिवसाने तो गळ्यातील ग्रंथीवर आघात करतो. 

असे आहे औषध

या विषाणूला रोखण्यासाठी आयुर्वेदिक ग्रंथाचा अभ्यास करुन आयुर्वेदिक तेल, भुकटी स्वरुपात दोन प्रकारचे पावडर तयार केले आहे. यातील औषधी दिवसातून दोन वेळा हे तेल नाकाद्वारे दोन थेंब टाकायचे आहे. तर एक पावडर हे गरम पाण्यात उकळून गुळण्या करण्यासाठी तर एक पावडर हे उपवासी पोटी दूध किंवा पाण्याबरोबर सेवन करावे लागणार आहे.

या वनस्पतीपासून तयार केले औषध-
तेल तयार करण्यासाठी तांबुळ (नागेलीची पाने), हिरिद्रा, केशक, हिंग यापासून नस्से तेल तयार करण्यात आले आहे. गंडुस नावाचा पंचक्रमामध्ये एक औषधी प्रकार आहे. हे पावडर भुकटी त्रिफळा, बेल यापासून तयार करण्यात आले आहे. तर अबरक टंकन, रशिंदूर, प्रवाळ शंक, ज्येष्ठ मध, तुळशी आणि गुळवेल यापासून हे प्राणसुत्राला बल्य असे म्हणतात. 

असे करा सेवन -
नस्से नावाचे औषधी तेल रोज नाकाद्वारे दिवसातून किमान दोन वेळेस नाकात दोन थेंब टाकणे, गंडुस नावाचे पावडर (भुकटी) रोज सकाळी तीन ग्रॅम कोमट पाण्यातून किंवा दूधातून घ्यावे. यामुळे ताकद वाढण्यास मदत होईल. तर काढा करुन गुळण्या केल्याने गळ्यातील इन्फेक्शन लाळेद्वारे बाहेर पडण्यास मदत होईल. या तिन्ही प्रकारच्या आयुर्वेदिक औषधाने कोरोनाचा आजार काही प्रमाणात परतवून लावण्यास मदत होईल, अशी शक्यता डॉ. पवार यांनी व्यक्त केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

Shaktipeeth Expressway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात 7 जुलैला एल्गार; मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे धरणे, 13 जिल्ह्यांतील बाधित शेतकरी सहभागी होणार!

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची लाय डिटेक्शन टेस्ट होण्याची शक्यता

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

IND vs ENG : 20 चेंडूत अर्धशतक; अभिषेक शर्माने मोडला केएल राहुलचा मोठा विक्रम, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT