नांदेडला कॉँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
नांदेडला कॉँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.  
नांदेड

Video - डिझेल, पेट्रोलच्या दरवाढीसंदर्भात कॉँग्रेसचे नांदेडला आंदोलन

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनामुळे अजूनही देशात लॉकडाउन असून भाजपच्या केंद्र सरकारने सामान्य माणसांना आधार देण्याऐवजी त्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारी पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली आहे. त्यामुळे ही दरवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी देशभर कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. २९) आंदोलन करण्यात आले. नांदेडला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन शहर व जिल्हा काँग्रेस समितीने पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यामार्फत निवेदन देऊन राष्ट्रपतींना या संदर्भात साकडे घातले आहे.

नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री अशोक चव्हाण यांना एक निवेदन दिले. हे निवेदन देशाचे राष्ट्रपती यांना संबोधित करुन तयार करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत पालकमंत्र्यांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात यावी, अशी विनंती काँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना यावेळी केली.

जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर याबाबतचे निवेदन पाच जणांचा समावेश असलेल्या काँग्रेस पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना दिले. यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, प्रवक्ते संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देताना उपरोक्त पदाधिकाऱ्यांसह प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बी. आर. कदम, जिल्हा परिषदेचे कृषी व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले आदी उपस्थित होते. यावेळी वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी बंदोबस्त तैनात केला होता. 

कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, कोषाध्यक्ष विजय येवनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, ओबीसी सेलचे  जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, सुरेंद्र घोडजकर, बाजार समितीचे सभापती संभाजी पुयड, काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल पावडे, प्रफुल्ल सावंत, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, नारायण श्रीमनवार, श्रीराम पाटील, बापूराव गजभारे, दयानंद वाघमारे, संतोष मुळे, मागासवर्गीय जिल्हा सेलचे अध्यक्ष गंगाधर सोंडारे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, शहराध्यक्षा अनुजा तेहरा, प्रदेश पदाधिकारी डॉ. रेखा चव्हाण, प्रकाशकौर खालसा, शिल्पा नरवाडे, हरविंदरसिंघ संधू, प्रमोद भुरेवार, उमाकांत पवार, सुमित मुथा, श्रीनिवास जाधव, सुरेश हाटकर,श्री हजारी, सुभाष पाटील आदी काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT