Nanded News
Nanded News 
नांदेड

Video - लॉकडाउन : अशी घ्यावी महिलांच्या आरोग्याची काळजी...

शिवचरण वावळे

नांदेड : प्रत्येक स्त्री त्या घरातली होम मिनिस्टर असते. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत घरातील प्रत्येक सदस्यांच्या आवडीनिवडीविषयी ती नेहमीच सजग असते. घरातल्या मिठापासून ते काडीपेटीपर्यंत सर्वच गोष्टींची तिला माहिती असते. 

घरातील इतरांच्या आरोग्याची काळजी घेणारी स्त्री स्वतःच्या आरोग्याकडे मात्र तितकेसे लक्ष देताना दिसत नाही. परिणामी तिचे आरोग्य धोक्यात येते. सध्या लॉकडाउन असल्याने महिलांवर अधिक ताण दिसून येतो. हा ताण हलका करण्यासाठी घरातील प्रत्येकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. आर. के. वाकोडे पाटील यांनी व्यक्त केले. 

महिलांचे आरोग्य बिघडण्याची कारणे
जगभरातील संशोधनातून महिलांचे आरोग्य बिघडण्याचे एक मुख्य कारण पुढे येते ते म्हणजे त्यांच्या लाजाळूपणा. तसेच घरातील इतरांची काळजी घेण्याकडे लक्ष देऊन स्वतःच्या आरोग्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे त्यांना गंभीर आजारांना सामोर जावे लागले असल्याचे वेळोवेळी सिद्द झाले आहे. पूर्वी वयाच्या ४५ - ५० वर्षांनंतर महिलांनमध्ये गर्भपिशवींचे आजार, स्तनाचा कॅन्सर, मुत्राशयाचे आजाराचा आदी धोके उद्‍भवत होते. परंतु, अलीकडच्या काळात २८ ते ३० वयोगटातील महिलांमध्ये हे आजार दिसू लागले आहेत. 

महिलांवर कामाचा ताण वाढला
कोरोनामुळे अनेक कुटुंब एकत्र आहेत. अशा काळात त्या महिलेची घरातल्यांप्रती सर्वांची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर कामाचा ताण वाढला असणार आहे. त्यांना स्वतःसाठी वेळ देता येणे शक्य नाही. परंतु, घरातील प्रत्येक व्यक्तीने आपापली जबाबदारी ओळखून घरातील कामे करण्यास प्राधान्य दिले तर आपली आई, पत्नी, बहिणींवरील कामाचा ताण सहज कमी करता येतो. महिलांवरील कामाचा ताण कमी झाल्यास लॉकडाउमध्येदेखील त्या चिंतामुक्त आरोग्य ठेवू शकतात. अन्यथा सध्या काही महिलांमध्ये तत्काळ काही गंभीर परिणाम दिसत नसले तरी भविष्यात त्यांच्या आरोग्यावर दुरगामी परिणाम जाणवतील, यात शंका नाही.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे महत्त्वाचे  
कोरोना आजारावर सध्यातरी कुठलेही प्रभावी औषध किंवा लस उपलब्ध नाही. ‘कोरोना’च्या भीतीने अनेजण घराबाहेर पडत नाहीत. या काळात जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती व होमिओपॅथिकच्या गोळ्या-औषधींच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि निरोगी आयुष्य जगणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोरोना काळात महिलांनीदेखील डॉक्टरांच्या सल्ल्याने होमिओपॅथिक औषध घेऊन मानसिकदृष्ट्या सुदृढ व निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा. कोरोनाच्या संकटाचा जास्त विचार करत न बसता आरोग्य जपणे गरजेचे आहे डॉ. वाकोडे पाटील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT