file photo 
नांदेड

Video : प्राध्यापकाने दिली पर्यावरण संवर्धनासाठी हाक

शिवचरण वावळे

नांदेड : मानवाने आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी निसर्गाचा अतिरिक्त वापर करून त्याला अक्षरशः उघडे-नागडे केले आहे. अजून परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. आपण सर्वांनी मिळून दैनंदिन जीवन जगत असताना पर्यावरण संवर्धनाची कामे केल्यास नक्कीच आपण पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून बचाव करु शकतो, असा विश्वास पर्यावरण प्रेमी प्रा. परमेश्वर पैळ यांनी व्यक्त केला आहे. 

प्रा.परमेश्वर पैळ हे मागील अनेक वर्षांपासून जलसवंर्धन, मृदा परिक्षण, खडकाळ जमिनिचा अभ्यास व पर्यावरण संवर्धनासाठी निस्वार्थ भावनेनी काम करत आहेत. सध्या कोरोनाच्या या संकटकाळात सर्वजण घरीच आहेत. आपल्या परिसरात आहात, या काळात आपण रेनवॉटर हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड व संगोपन, घनकचऱ्याचे व्यवस्थापन करुन आपल्या परिसरातील स्वच्छतेची कामे, शोष खड्डांची निर्मिती करुन वेळेचा सदुपयोग केल्यास जलपातळी सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदतगार साबित होईल, असे प्रा. पैळ यांना वाटते.

मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाची गोडी निर्माण व्हावी

दरम्यान रेनवॉटर हार्वेस्टिंकेशन सोबतच घरातील लहान मुलांना व विद्यार्थ्यांना पर्यावरणासंदर्भात शिक्षण व त्याची जाणीव करून देऊन पर्यावरणाचे बिघडण्यामागे केवळ एकच व्यक्ती जबाबदार नाही तर आपण सर्व जण जबाबदार आहेत. अशी जाणीव लहान मुलांना करुन दिल्यास मुलांमध्ये देखील लहान वयापासूनच पर्यावरण संवर्धनाची गोडी निर्माण होईल आणि निसर्गाबद्दल त्यांना आत्मियता वाटायला लागेल. 


 
नैसर्गिक संसाधनाचा हवा तेवढाच वापरा

यामुळे पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पुर्ववत आणण्यासाठी केवळ एका व्यक्तीने, संघटनेने, पक्षाने, संस्थेने आणि सरकारने प्रयत्न करून चालणार नाही, तर पर्यावरणाचा बिघडलेला समतोल पूर्ववत करण्याची जबाबदारी आपलीपण आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्ट विकत घेण्याची क्षमता असली तरी, नैसर्गिक संसाधनाचा आपण हवा तेवढाच वापर केला पाहिजे, असे मत प्रा.डॉ. परमेश्वर पौळ यांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT