file photo 
नांदेड

Video - काय बांधावे आणि काय कमवावे, असा पडला यक्ष प्रश्‍न...

अभय कुळकजाईकर

नांदेड - बांधकाम व्यवसायालादेखील कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली बांधकामे आता हळूहळू सुरु झाली आहेत. मात्र, असे असले तरी वाळू, सिमेंट, गजाळी आदी बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमती तसेच मजुरांची उपलब्धता लक्षात घेता आता शासनाने मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत काय बांधावे आणि काय कमवावे, अशा यक्ष प्रश्‍न पडला असून त्याची सोडवणुक झाली नाही तर बांधकाम व्यावसायिकांवर शेतकऱ्यांसारख्या आत्महत्या करण्याची वेळ भविष्यात येऊ शकते.

जगभरात कोरोनाचा झालेला फैलाव लक्षात घेऊन अनेक देशात लॉकडाउन लावण्यात आला. भारतातही दोन महिने लॉकडाउन होता. आताही महाराष्ट्रासह काही राज्यात लॉकडाउन सुरु आहे. मात्र, त्यात नियम व अटी, शर्थी टाकून शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे दुकाने सुरु झाली आहेत. लॉकडाउनच्या काळात नांदेड शहर आणि जिल्ह्यात सुरु असलेली बांधकामे, प्रकल्पही बंद होते. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. बांधकाम व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार, मिस्त्री, दुकानदार, व्यावसायिक सगळेच अडचणीत आले होते. त्याचबरोबर महापालिकेच्या नगररचना विभागात देखील बांधकाम करण्यासाठी आलेल्या फाईलींची संख्या अतिशय कमी होती. आता लॉकडाउन शिथील झाल्याने हळूहळू बांधकामांना देखील सुरवात झाली आहे.

बांधकाम व्यावसायिकांचे मोठे नुकसान - रेणापूरकर
गेल्या तीस वर्षापासून या व्‍यवसायात असलेले आर. के. बिल्डर्सचे प्रमुख बलभीम रेणापूरकर म्हणाले की, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले आहे. गुडीपाडवा, अक्षयतृतीय, रामनवमी अशा सणाच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिक नवनवीन प्रकल्प सुरु करतात पण यंदा कोरोना आणि लॉकडाउनमुळे हे शक्य झाले नाही. त्याचबरोबर वाळूचा लिलाव झाला नसल्याने भाव गगनाला भिडले आहेत. सिमेंट, गजाळीचे कारखाने बंद असल्याने त्याचेही भाव वाढले आहेत. २२० वरुन ३४० रुपयांना सिमेंटचे पोते तर गजाळीचा भाव तीन हजार चारशेवरुन चार हजार सहाशेपर्यंत गेला आहे. तसेच आता मजूरही नसल्याने बांधकाम व्यावसायिक अडचणीत आला आहे.  

बॅंकांना द्यावा लागणार मदतीचा हात
आता यामध्ये बॅंकांची भूमिका महत्वाची राहणार आहे. बॅंकांनी कर्ज मंजूर केले तरच त्याचा थोडाफार फायदा होणार आहे. जी बांधकामे अधिकृत आहेत त्यांना कर्ज देण्यासाठी त्याचबरोबर ग्राहकांना पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बॅंकांनी प्रयत्न केले तर निच्शितच त्याचा फायदा ग्राहकाला तसेच बांधकाम व्यावसायिकांना होईल. वन बीएचकेसाठी सहा लाख तर टू बीएचके साठी दहा लाखापर्यंतचे कर्ज बॅंकांनी दिले तर त्याचा फायदा ग्राहकांसह, बांधकाम व्यावसायिक आणि बॅंकांनाही होईल. त्याचबरोबर त्यांना पंतप्रधान घरकुल योजनेचा दोन लाख ७० हजाराचा लाभही घेता येईल व घरभाडे भरण्यापेक्षा स्वतःच्या घरात राहता येईल, असे मत बांधकाम व्यावसायिक श्री. रेणापूरकर यांनी व्यक्त केले आहे.  

मजुरांची समस्या मोठी - बच्चेवार
तिरुमला कन्‍स्ट्रक्शनचे प्रमुख कमलेश बच्चेवार म्हणाले की, बांधकाम व्यवसाय हा महत्वाचा असून त्यावर अनेक छोटे मोठे उद्योग आणि काम करणारी माणसे अवलंबून असतात. कोरोनामुळे हे सगळे ठप्प झाले असून त्यांचा रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बांधकामासाठी सर्वात महत्वाचे असते ते मजूर वर्ग. हा बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी भागातला आहे. आता तो आपआपल्या गावी गेल्याने मजुरांची समस्या मोठी राहणार आहे. 

कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे - वाघमारे
डिझाईन कन्सेप्टचे संचालक विशाल वाघमारे भाटापूरकर म्हणाले की, कोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेक बांधकामे बंद आहेत. महापालिकेकडे बांधकामासाठी परवानगीचे अर्ज देण्यात आले आहेत. मात्र, कोरोनामुळे सध्या परिस्थिती बिकट असून त्यातून लवकरच मार्ग निघावा, हीच अपेक्षा आहे. 

सरकारचे हवे अर्थसहाय्य
बांधकाम व्यावसायाला यातून बाहेर काढण्यासाठी सरकारने मदतीचा हात पुढे करुन आर्थिक मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी बॅंकांना कर्जासाठीच्या सूचना देण्यासोबतच बांधकाम व्यावसायिकांनी देखील कर्जाच्या अनुषंगाने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. कारण कोणीही चार पैसे मिळावेत आणि चार पैसे वाचावेत म्हणून व्यवसाय किंवा नोकरी करत असतो. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात किंवा त्यानंतर सर्वांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न केले तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल आणि कोरोनाच्या या संकटातून उभारी मिळू शकेल, अशी अपेक्षाही बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray Statue Vandalised : मीनाताईंच्या पुतळ्यावर रंगफेक; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबईत तणाव वाढला

Pune News : अंगणवाड्यांची धोकादायक स्थिती; बालशिक्षण धोक्यात; दाटीवाटीत मुलांचे शिक्षण, सुरक्षिततेचा प्रश्न

Share Market मध्ये नुकसान झालं नाशिकच्या दोन पठ्ठ्यांनी असा मार्ग निवडला की पोलिसांनीही डोक्याला हात मारला; नेमकं काय घडलं?

Robbery At SBI Bank : स्टेट बँकेच्या शाखेवर पिस्तूल, चाकूने धमकावून दरोडा, आठ कोटींचा ऐवज लुटला, पोलीस घटनास्थळी दाखल

Navratri 2025 Do's and Don'ts: शारदीय नवरात्रात काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT