nanded news 
नांदेड

Video - खरीपपूर्व कामामुळे मजूरांच्या हाताला मिळाले काम

विश्वनाथ कहाळेकर

नांदेड : मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या धास्तीने अनेक व्यवसाय बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे मोठ्या शहरांतून कामगार आपापल्या गावी परतले आहेत. खेडेगावांत काम नसल्यामुळे त्या कामगारांवर अनेक संकटांचा सामना करण्याची वेळ आली होती. मात्र, सध्या पावसाळा जवळ येत असल्याने शेतकऱ्यांनी खरीपपूर्व कामाला सुरवात केली आहे. त्यामुळे मजूरदारांच्या हाताला काम मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे चित्र दिसत आहे. 

ग्रामीण भागात शेतीशिवाय दुसरे पर्यायी व्यवसाय उपलब्ध नाहीत. त्यामुळे कामाच्या शोधात ग्रामस्थ मोठमोठ्या शहरांमध्ये वास्तव्यात आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून कोरोना या रोगाने शहरी भागामध्ये दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे संपूर्ण भारत लॉकडाउन करावे लागले. परिणामी, मोठमोठ्या कंपन्यांसह शहरी भागातील सर्वच उद्येगधंदे काही काळापुरते बंद ठेवावे लागले. यामुळे खेडेगावांतून शहरांमध्ये कामासाठी गेलेल्या कामगारांना काम मिळेणासे झाले. त्यामुळे ते ग्रामस्थांनी आपापल्या गावचा रस्ता पकडला व थेट गावात दाखल झाले. गावात आल्यानंतरही त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. गावात रेजगार नाही, राहण्यास काहींना घरेही नाहीत, रेशन कार्ड नसल्यामुळे रेशन धान्य मिळत नाही, हाताला काम नाही व हातात पैसाही नाही, अशा अनेक समस्या त्याना उद्‍भवल्या.

शेतीकामे हंगामानुसारच
ग्रामीण भागात शेतीशिवाय काम करण्यास दुसरा पर्याय नाही. ही कामेही हंगामानुसारच चालतात. पाण्याखाली शेती असणाऱ्यांना थोडेफार बारमाही काम लागते. मात्र, आपल्या परिसरातील जास्त शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे. त्यामुळे खरीप व रब्बी असे दोन हंगाम शेतकरी पिके घेतात. त्यातून कामगारांना शेतीत कामासाठी पेरणीच्या सुरवातीला व काढणीच्या वेळीच लावले जाते. बाकी वेळेत अत्यंत कमी मजूरदारांवर कामे भागतात.

आता खरिपाची तयारी 
या वर्षी वेळेवर खरीप पेरणी होईल, असा अंदाज मौसम विभागाने वर्तविला आहे. तसेच अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊसही हजेरी लावत आहे. त्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी शेतीकामास वेग दिला आहे. यात नांगरणी, वखरणीची बरीच कामे आटोपली आहेत. त्यामुळे आता कचरा, पऱ्हाट्या, तुराट्या वेचणीसाठी मजूरदार लावत आहेत. यातून रोजगारांना काम लागत असल्याने ते सुखावल्याचे चित्र ग्रामीण भागातून दिसून येत आहे.

शेतकरी मात्र अडचणीतच
शेतीवर मागील चार-पाच वर्षांपासून निसर्ग कोपल्याचे चित्र असून, नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने शेती अडचणीतच येत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, अजूनही काहींना पीकविमा मिळाला नाही, तर पीककर्जाचे अजूनही वाटप सुरू झाले नाही. त्यातच थोडाफार पिकलेला मालही बेभाव विकावा लागला. सध्या खरिपाची तयारी चालू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे बैलजोडी उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना यंत्रानेच शेतीची मशागत करावी लागत आहे. यासाठी बराच पैसा खर्च होत आहे. तसेच मजूरदार, बियाणे, खत यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. मात्र, हाती पैसाच नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasantha Ramaswamy : माजी शास्त्रज्ञ डॉ. वसंथा रामास्वामी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Mumbai Crime: आईचं मुलीच्या प्रियकरावर प्रेम जडले, एकत्र राहण्यासाठी मास्टरप्लॅन आखला, पण नंतर जे घडले त्याने सगळेच हादरले

Latest Marathi News Updates Live : साडेतीनशे एकर जागेवरील कांदळवन केले नष्ट

Arjun Tendulkar : सचिनच्या लेकाने मैदान गाजवले, महाराष्ट्राच्या पाच फलंदाजांना धडाधड तंबूत पाठवले, पहिल्या चेंडूवर विकेट अन्...

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा; ८५०० कोटींची देणार भेट, यंत्रणा तैनात पण अधिकृत घोषणा नाही

SCROLL FOR NEXT