गोवर्धन घाट
गोवर्धन घाट 
नांदेड

मोक्षप्राप्तीसाठी नातलगांच्या नशिबी प्रतिक्षा ; नांदेडच्या अनेक घाटावरील चित्र

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्गाने हैदोस घातला आहे. जिवाचा थरकाप उडवणाऱ्या रुग्ण संख्या व मृत्यूची संख्या पहाता अनेकांना या संसर्गाची वेदना सहन करावी लागत आहे. कोरोना (Corona) रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू (pationt death) झाला तर अजून मोठे संकट उभे राहत आहे. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना वेटींगवर राहावे लागत आहे. एवढेच नाही तर दशक्रिया व अन्य विधा करण्यासाठीसुद्धा नातेवाईकांची ससेहोलपट सुरु आहे. Waiting for the fate of relatives for salvation; Picture of several ghats of Nanded

कोरोनाच्या वेदना सहन करत नातेवाईक रुग्णालयात बेड मिळविण्यापासून ते स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यापर्यंत अशा प्रत्येक ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातलगांना प्रतिक्षा करावी लागत आहे. घरातील सदस्य मरण पावल्यानंतर घाटावर करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या धार्मिक विधीसाठी ही त्यांना आपला क्रमांक लावण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या वाढल्याने राम घाट व गोवर्धनघाटावर दररोज 15 ते 20 जणांचे धार्मिक विधी होत आहेत. या ठिकाणी दशक्रिया, अस्थिविसर्जन आदी धार्मिक विधी करणारे ठराविक पुरोहीत असल्याने जवळच्या व्यक्तीच्या मोक्षप्राप्तीसाठी नातलगांच्या नशिबी वेटिंगचा प्रवास सुरुच असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र सरकारला या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही. गायकवाड समितीच्या शिफारशींबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयासही सर्वोच्च न्यायालयाने केराची टोपली दाखविली.

कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना दररोज होणाऱ्या मृत्यूचे आकडे थरकाप उडवणारा ठरत आहेत. गेल्या काही दिवसात सरासरी 25 पेक्षा अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू दररोज होत होता. आता ही संख्या काही अंशी कमी झाली. नात्यातील व्यक्तीला जर कोरोना झाला तर त्याला उपचार वेळेत मिळावा यासाठी फरफट करावी लागत आहे. एवढेच नाही तर अंत्यसंस्कारासाठी त्यांना घाटावर प्रतिक्षा करावी लागत आहे. कोरोनाने दिलेल्या वेदना इथेच संपत नाहीत.

कुटुंबातील निधन झालेल्या व्यक्तीच्या मोक्षप्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या धार्मिक विधीसाठी नातेवाईकांवर प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे. शहरातील राम घाट, तारातिर्थ घाट, नगिना घाट तसेच गोवर्धन घाटावरचे चित्र अनेकदा पाहावयास मिळत आहे. परंपरेनुसार सकाळी त्या धार्मिक विधी होत असल्याने घाटावर आपला क्रमांक लागेपर्यंत अनेकांना वाट पाहण्या पलीकडे दुसरा पर्याय उरला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT