file photo 
नांदेड

सावधान : कोरोना रुग्ण शतकापार गेलेल्या नांदेडमध्ये सर्व अलबेल

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरात व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसतांना पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून कडक पाऊले उचलण्यात आली होती. त्या दरम्यान नांदेडमध्ये रुग्ण संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. परंतु या संख्येचा स्फोट झाला असून आजघडीला १२७ रुग्णांची नोंद झाली आहे. वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाउन कडक करणे अपेक्षीत असतांना मात्र मागील दोन दिवसांपासून सर्वत्र अलबेल सुरू आहे. शारिरीक अंतराचे नियम तुडवत नागरिकही रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे काही सुज्ञ नागरिकांतून प्रशासनाच्या भुमिकेवर तिव्र नाराजी व्यक्त करत आहेत. 

नांदेड शहर व जिल्ह्यात कोरोनाने आपली पकड घट्ट केल्याचे दिसून येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला. लॉकडाउनमध्ये सुरवातीला नांतदेडकरांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. कामाशिवाय घराबाहेर न पडता सहकार्य केले. त्यामुळे प्रशासनावरही ताण आला नव्हता. सुरवातीच्या काळात हातावर पोट असलेल्यांना धान्याच्या किट वाटप केल्या. यासाठी सामाजीक संस्था, राजकिय पक्ष तसेच प्रशासानानेही गरजू व आवश्‍यक नागरिकांना धान्य वाटप केले. परंतु वाटप केलेले धान्य एक दीड महिण्यात संपले. तसेच हाताला काम नसल्याने पदरमोड खाण्याची वेळ आली. आता या कामागारांना खरी गरज आहे ती अन्न- धान्याची व कामाची.

मुंबई व पुणे येथून आलेल्यांमुळे संख्येत वाढ

जवळपास पावणेतीन महिणे उलटत असल्याने घरात राहूनही नागरिक बेचैन झाले आहेत. तर दुसरीकडे रस्त्यावर उभे राहून प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी थकुन गेल्याचे पाहवयास मिळत आहे. कोरोनाची वाढ लक्षात घेता मुंबई व पुणे येतून आलेल्या कामगारांमुळे होत असल्याचे पुढे आले आहे. बाहेर गावाहून आलेल्या कामगारांना किंवा नागरिकांनी लगेच क्वारंटाईन करण्यात येत आहे. तरीसुद्धा काही बेसावध नागरिक प्रशासनाला न कळवता ते थेट आपल्या परिवारात किंवा नातावाईकात जावून राहात आहेत. त्याचा मोठा धोका या परिवाराला व परिसरातील नागरिकांना होत आहे. 

व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया

तर दुसरीकडे शहरात लावण्यात आलेले बॅरीकेट्स काढण्यात आल्याने व शहरातील सर्वच आस्थापना सुरू केल्याने शहरात सर्वत्र वर्दळ दिसून येत आहे. ही बाब नांदेडकरांसाठी घातक असल्याचे राहूल वाघमारे यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊनमध्ये शारिरीक अंतर पाळून जर कोरोनावर मात करता आली तर नागरिकांनी याबाबत सतर्कता पाळण्यास काय हरकत आहे असेही गौत्तम जैन यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Lanke Health Update : निलेश लंकेची हेल्थ अपडेट समोर, तब्बेतीत सुधारणा; दगडुशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

Pune News: पुणे महापालिकेचा इंधनबचतीसाठी पुढाकार; वाहन वापरात ३० टक्के कपातीचा प्रशासनाकडून प्रस्ताव

Devendra Fadnavis Cabinet Instructions : सार्वजनिक वाहतूक, विमान प्रवासावर मंत्र्यांना बंधणे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाला सूचना

Latest Marathi News Live Update : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच खासदार नीलेश लंकेंनी घेतलं दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

SCROLL FOR NEXT