File photo 
नांदेड

‘यांच्या’ अखंडित सेवेमुळे आपण घरात सुखरूप आहोत, कोणामुळे? ते वाचलेच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : देशावर आलेल्या कोरोना संकटात सर्वजण आपापल्या परीने योगदान देत आहेत. देश पातळीवर असो की राज्य पातळीवरील असो अनेकांनी यात समर्पण भाव दाखवत मोठे काम आजवर केले आहे. सामान्य लोक माझा देश या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडो अशी प्रार्थना करत आहेत.  

जे आपल्या हाती असते ते अशा आपत्कालीन परिस्थितीत केलेच पाहिजे ही राष्ट्र भावना आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारी पातळीवरील अनेक विभाग कार्यरत आहेत. यात आरोग्य विभाग, पोलिस विभाग, महसूल विभाग, अन्नधान्य विभाग, ग्रामीण विभाग आदींचा समावेश आहे.  

कोरोनाच्या संकटामध्येही ज्यांची सेवा अखंडित सुरु असून ती सर्वांसाठी उपयुक्त ठरत आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांची सेवा. गेल्या दिड महिन्यांपासून जग थांबलंय. प्रवास थांबला. परीक्षा थांबल्या. रेल्वे थांबल्या. विमान थांबले. रिक्षा थांबल्या. मंदिरे बंद झालीत. एकत्रित नमाज बंद झाली. पण शेतकऱ्यांचे शेतीचे काम कुठं थांबलय? सर्व सेवाधारीमध्ये तसेच देशातील तमाम लोकांना उदरभरण करण्याची सोय ज्यांच्या सेवेने झाली त्यांच्या सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख हा सर्वांनाच करावा लागेल.

शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता बाळगावी
कोरोनाच्या संकाळात जर शेती काम थांबले तर काय झाले असते? या काळात शेतकरी बांधवांनी पिकविलेले अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध आदी जीवनावश्‍यक सेवा दिल्यामुळे अखिल जगत तृप्त आहे. उपाशी पोटी कोणीही ज्ञान पोचवू शकत नाही. त्यासाठी उदरभरण असल्याशिवाय ज्ञानाकडे मन वळत नाही. त्यामुळे या काळात ज्यांच्या सेवेमुळे आपण सुखरूप घरी आहोत त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायलाच पाहिजे.

शेतीसाठी लागतेय इतरांचीही मदत
संकट कोणतेही असो, पहिल्यांदा झळ सहन करावी लागते ती शेतकऱ्यांना. दुष्काळ असो, गारपीट असो की हवामानातील बदल असो, या सर्व नैसर्गिक सोबत काही मानवनिर्मित घटकांचे विपरीत परिणाम शेतकऱ्यांनाचा सर्वाधिक सहन करावे लागत आहेत. शेतकरी आणि शेती यासाठी अनेक लोकांची मदत देखील लागत असते. पण या काळात मजूर अभावी बऱ्याच ठिकाणी हाती आलेले उत्पादन पदरात पडले नाही. 

आजची परिस्थिती सुधारेल का?
आजची परिस्थिती कधी सुधारेल, याची नेमकी माहिती आपल्याकडे नाही. अशात खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठीची धावपळ करावी लागेल. बियाणे खरेदी करणे, खते खरेदी करणे आदी कामे लवकरच हाती घ्यावे लागणार आहे. पण यासाठीची जी तरतूद लागते ती सर्व शेतकरी बांधवांकडे असेलच, हेही खात्रीने सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे.   

शेतकऱ्यांचा संघर्ष नोंद घेणारा
कोरोनाच्या संकटात अखंड सेवा देण्याचे काम शेतकरीच करू शकतात. सध्याच्या या परिस्थितीत सर्व बाबतीत करावा लागणारा संघर्ष हा नोंद घेणारा ठरला आहे.
- रामेश्‍वर ठोंबरे (कृषी सल्लागार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's Asia Cup Rising Stars : भारतीय महिलांनी जिंकला आशिया चषक; महाराष्ट्राची पोरगी चमकली, बांगलादेशला मात दिली

Budget Session: अधिवेशन सुरू होण्याआधीच रणसंग्राम! बहिष्कार, सरकारला 6 गंभीर मुद्द्यांवर घेरण्याची तयारी, काय आहे विरोधकांचा प्लॅन?

Nashik Municipal Corporation : गुंतवणुकीची सुवर्णसंधी! नाशिककरांनाही खरेदी करता येणार महापालिकेचे 'हरित कर्जरोखे'

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, मंत्री झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी

Ozar Bus Stand : ओझर बसस्थानकात अखेर पाच वर्षांनंतर लालपरीची ‘घरवापसी’! आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन झुकले

SCROLL FOR NEXT