फोटो 
नांदेड

शेतशिवारांनी नेसला हिरवा शालु

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : रोहिनी नक्षत्रातच पावसाने सुरूवात केल्याने एकीकडे सर्वत्र होणारा उकाडा कमी झाली. तर दुसरीकडे माळरान व शेतशिवाराने हिरवा शालु पांघरला आहे. नांदेड शहरापासून जवळच असलेल्या रत्नेश्‍वरी घाट परिसरात शेतशिवार हिरवेगार दिसत आहे. पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने सर्वत्र ओडखी -बोडखी जंगल हिरवेगार होत असून शेतकरी आपल्या काळ्या आईची कुशी भरण्यास सज्ज झाला आहे. 

लोहा तालुक्यात असलेल्या रत्नेश्‍वरी हा भाग मोठ्या माळरानानी व्यापलेला भाग आहे. या परिसरात उंच डोंगरावर प्रसिध्द रत्नेश्‍वरी मातेचे मंदीर आहे. डोंगराच्या पायथ्याशी शेत शिवार असून या शेतात पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाले आहे. रोहिनी मृग नक्षत्राच्या शेवटी आणि मृगाच्या सुरवातीला जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने जंगल व शेतशिवारात हिरवळ फुटली आहे. ही हिरवळ पाहून मन प्रसन्न होत असून काही शेतामध्ये पेरणीसुद्धा सुरू करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

यावर्षी सुरवातीलाच चांगला पाऊस
 

नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षापासून सतत आवर्षण होत होते. म्हणजे पाहिजे असा पाऊस पडत नव्हता. गतवर्षी मात्र चांगला पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला होता. अनेक पाणी साठवण तलाव भरून ओसंडून वाहत होते. त्यामुळे जिल्ह्यात शेवटपर्यंत पाणी टंचाई जाणवली नाही. परत यावर्षी पावसाने सुरवातीलाच चांगली सुरवात केल्याने शेतकरी राजा सध्या तरी आनंदीत आहे. आपल्या काळ्या आईची कुशी भरण्यास सुरूवात केली आहे. ओसाड माळरानावर आता सर्वत्र हिरवळ पसरली असल्याचे चित्र दिसत आहे. 

जिल्ह्याचा बराच भाग जंगलाने व्यापीत

नांदेड जिल्ह्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात जंगलाचे क्षेत्र आहे. त्यात किनवट, माहूर, हिमायतनगर आणि भोकर या तालुक्यात वनविभागाच्या मालकीचे जंगल आहे. या जंगलात जंगली प्राणी वास्तव्य करीत असून त्यांनाही पासवसाळ्यामध्ये लपण्यासाठी चांगली जागा मिळते. जंगल परिसर हा हिरवा शालु पांघरत असून सर्वत्र म्हणजेच नजर पोहचेल तिथपर्यंत सृष्टीवर हिरवळ दिसत आहे. 
लोहा तालुक्यातील रत्नेश्‍वरी परिसर हिरवाईने नटला आहे. रत्नेश्‍वरी मंदीराला जाणारा प्रत्येक भक्त उंच डोंगरावरुन हे विहंगम दृष्य पाहत आहेत.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

R ASHWIN: भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्यासाठी नेमकं काय केलं? अश्विनने सांगितली महत्त्वाची गोष्ट; मोहम्मद शमीवरही मांडलं मत!

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

SCROLL FOR NEXT