Nanded Fire Accident News
Nanded Fire Accident News esakal
नांदेड

लग्नाची तयारी सुरु असताना कुटुंबावर विघ्न, घरात अचानक लागली आग

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड ) : शहरातील संत रोहिदासनगरात राहणारे विनकरे कुटुंब लग्नाची तयारी करित असतानाच गुरुवारी (ता १४) सायंकाळी अचानक घरात आग लागली. यात संसारोपयोगी साहित्य, वधू-वरांसाठी आणलेले कपडे, धान्य जळुन खाक झाली आहे. नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. अर्धापूर (Ardhapur) येथील बालाजी पुंजाजी विनकरे यांच्या कुटुंबातील तरुणाचा रविवारी (ता.१७) विवाह सोहळा असल्याने या विवाहाची जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्याच्या तयारीत असतानाच सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. (Wedding Ceremony Preparedness Going On, Fire Broke Out In Home In Ardhapur Of Nanded)

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडने अचानक पेट घेतला. आगीने घरातील महिला घाबरून गेल्या. आगीने रौद्र रूप धारण केल्याने मदतीसाठी हाक देण्यात आली. आजुबाजूला राहणारे नागरिक मदतीला धावून आले व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आग आटोक्यात येत नाही हे लक्षात आल्यावर नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. पण वाहन चालक वेळेवर उपस्थित नसल्याने एकाच धावपळ उडाली. अग्निशमन दलाचे जवान डोईफोडे यांनी तातडीने हालचाल करत आग आटोक्यात आणली. (Nanded)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT